Pune Water Supply | गढूळ पाणीपुरवठा | पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची उद्या पाहाणी | दोन दिवसात उपायोजना करणार

Homeadministrative

Pune Water Supply | गढूळ पाणीपुरवठा | पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची उद्या पाहाणी | दोन दिवसात उपायोजना करणार

Ganesh Kumar Mule Jul 16, 2026 8:32 PM

Pune Traffic News | कोरेगाव पार्क, बंडगार्डन मधील वाहतूक समस्या सोडवा | वाहतूक विभागास १०जुलैपर्यंत अंतिम मुदत
PMC Encroachment Action | आंबेगाव बु मध्ये सिंहगड कॉलेज जवळील 11 अनधिकृत इमारतीवर महापालिकेकडून कारवाई!
Devendra Wadke PMC | पुणे मनपाच्या भाडेतत्त्वावरील मालमत्तांवर कोट्यवधींची थकबाकी | नगरसेवक देवेंद्र वडके यांच्या प्रश्नावरून खुलासा

Pune Water Supply | गढूळ पाणीपुरवठा | पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची उद्या पाहाणी | दोन दिवसात उपायोजना करणार

| श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  पुणे शहरातील काही भागांत होत असलेल्या गढूळ पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उद्या (17 जुलै) पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला संयुक्त भेट देऊन पाहाणी करण्याचे, निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले. (Shrinath Bhimale PMC)

पावसाळ्यात खडकवासला धरणातील वाढलेल्या गढूळतेचा जलशुद्धीकरण प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होत आहे, याचा प्रत्यक्ष आढावा या भेटीत घेण्यात येणार आहे.

भिमाले यांनी पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची विद्यमान क्षमता, यंत्रसामग्रीची स्थिती, वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे पडणारा अतिरिक्त ताण तसेच पावसाळ्यात वाढणाऱ्या एन टी यू पातळीवर नियंत्रणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाबाबत प्रशासनाने सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन शहरातील सर्व जलशुद्धीकरण केंद्रांच्या आधुनिकीकरणासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश भिमाले यांनी दिले.

यावेळी प्रशासनाने गढूळ पाणीपुरवठ्याची नेमकी कारणे प्रत्यक्ष पाहणीनंतर निश्चित करण्यात येतील आणि त्यावर तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या जातील, अशी ग्वाही दिल्याचे भिमाले यांनी सांगितले .

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: