Good News for Punekars | पुणे शहरातील पाणीकपात ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित | १२ जुलै नंतर पुढील निर्णय

Homeadministrative

Good News for Punekars | पुणे शहरातील पाणीकपात ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित | १२ जुलै नंतर पुढील निर्णय

Ganesh Kumar Mule Jul 06, 2026 7:21 PM

Field officer | PMC Pune | शिक्षण विभागाच्या फिल्ड अधिकाऱ्यावर राहणार नजर 
Pune Rain | Tree Fall | शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना
The Maharashtra Lokayukta Bill | महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार

Good News for Punekars | पुणे शहरातील पाणीकपात ७ जुलैपासून तात्पुरती स्थगित | १२ जुलै नंतर पुढील निर्णय

| आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ५ दिवस दिलासा

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – पुणे शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चांगल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्याचबरोबर *आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी पुण्यात दाखल होत असल्याने  ७ जुलै  पासून लागू असलेली पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.  पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे  मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली आहे. (Palakhi Sohala 2026)

पाणीकपात का लागू करण्यात आली होती?
१४ जून पर्यंत धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने आणि धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने, पुणे मनपाने  १५ जून  पासून शहरात *एक दिवसाआड पाणीपुरवठा* करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाणीकपात लागू करण्यात आली होती.

*आता कपात का स्थगित?
मनपाच्या पत्रानुसार सध्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. याशिवाय *पालखी २०२६ चे औचित्य साधून* वारकरी संप्रदायाचे मोठ्या प्रमाणावर आगमन पुणे शहरात होत आहे. भाविकांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी  ७ पासून ते  १२ पर्यंत* पाणीकपात रद्द करण्यात येत आहे. या कालावधीत शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

*१२ जुलै नंतर काय?*
१२ अखेर धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणांतील पाणीसाठा यांचा आढावा घेऊन *पाणीकपातीबाबत पुढील निर्णय* घेण्यात येणार आहे, असे मनपाने स्पष्ट केले आहे.

*अधिकार्‍यांना सूचना*
पाणीपुरवठा विभागातील सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग आणि वितरण विभाग यांना या कालावधीत पुणे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे पुढील ५ दिवस पुणेकरांना पाणीकपातीचा त्रास होणार नाही. मात्र, पावसाची स्थिती आणि धरणांतील साठा यावर पुढील पाणीपुरवठ्याचे नियोजन अवलंबून राहणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0