PMC 101 School Closed | वारकऱ्यांच्या सेवेसाठी  जिथे दिंड्या उतरतात त्या पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना येत्या रविवार पर्यंत सुट्टी | १२ जुलैपर्यंत पाणी कपात रद्द |  महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा 

Homeadministrative

PMC 101 School Closed | वारकऱ्यांच्या सेवेसाठी  जिथे दिंड्या उतरतात त्या पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना येत्या रविवार पर्यंत सुट्टी | १२ जुलैपर्यंत पाणी कपात रद्द |  महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा 

Ganesh Kumar Mule Jul 06, 2026 7:09 PM

Mohalla Committee | PMC Pune | मोहल्ला कमिटीच्या कामकाजाबाबत अधिकारी उदासीन  | प्रशासकीय कारवाई करण्याचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा 
PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 
Marathi culture | G 20 | परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

PMC 101 School Closed | वारकऱ्यांच्या सेवेसाठी  जिथे दिंड्या उतरतात त्या पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना येत्या रविवार पर्यंत सुट्टी | १२ जुलै पर्यंत पाणी कपात रद्द |  महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेने तातडीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांच्या निवारा, भोजन व अन्य आवश्यक सुविधांसाठी पुणे महानगरपालिकेच्या जिथे दिंड्या उतरतात त्या १०१ शाळांना उद्यापासून रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी दिली. (Mayor Manjusha Nagpure)

महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळांमध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार असून, शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

१२ जुलैपर्यंत पाणी कपात रद्द

तसेच, १२ जुलैपर्यंत पाणी कपात रद्द करण्यात आली असून, वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा कोणताही अभाव भासू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरात बसण्याची व्यवस्था उभारण्यात आले असून . आवश्यकतेनुसार इतर शाळाही निवारा केंद्र म्हणून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

यावेळी महापौर मंजुषा ताई नागपुरे यांनी सांगितले की, “वारकरी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे मानबिंदू आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी पुणे महानगरपालिका पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.”

पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांच्यात समन्वय राखून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: