Pune Rains | संततधार पावसामुळे पुण्यात २४ तासांत ८३ झाडे कोसळली | गेल्या ६ दिवसांत १६३ घटना

Homeadministrative

Pune Rains | संततधार पावसामुळे पुण्यात २४ तासांत ८३ झाडे कोसळली | गेल्या ६ दिवसांत १६३ घटना

Ganesh Kumar Mule Jul 06, 2026 6:53 PM

Arvind Shinde | वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीने  ईआयएल या त्रयस्थ संस्थेकडून महापालिकेत भ्रष्टाचार  | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप 
Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार | महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिला विश्वास 
Annasaheb Waghire College | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात ग्रंथ दिंडीचे आयोजन

Pune Rains | संततधार पावसामुळे पुण्यात २४ तासांत ८३ झाडे कोसळली | गेल्या ६ दिवसांत १६३ घटना

अग्निशमन दलाची युद्धपातळीवर कामगिरी, कोणतीही जीवितहानी नाही*

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – पुणे शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काल सायंकाळी ५ ते आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत शहरातील विविध भागात *८३ झाडपडीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.  गेल्या सहा दिवसांचा विचार करता, शहरात एकूण *१६३ झाडे कोसळल्याची नोंद* पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे आहे. (Pune Rain News)

*अग्निशमन दलाची तातडीची कामगिरी*
पावसाचा जोर वाढताच अग्निशमन दलाने संपूर्ण शहरात *सतर्कता बाळगत युद्धपातळीवर काम* सुरू केले. कोसळलेल्या झाडांमुळे बंद झालेले रस्ते, वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका या सर्वांवर तातडीने तोडगा काढण्यात आला.

पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंद झालेल्या सर्व ८३ घटनांवर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पोहोचून झाडे हटवण्याची कामगिरी पूर्ण केली आहे.

कोणतीही जीवितहानी नाही*
दिलासादायक बाब म्हणजे या सर्व झाडपडीच्या घटनांमध्ये *कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही*. केवळ काही ठिकाणी वाहनांचे किरकोळ नुकसान झाल्याचे समजते.

*प्रशासनाचे आवाहन*
सध्या हवामान विभागाने पावसाचा इशारा कायम ठेवला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
1. *जुनी, कमकुवत आणि वाऱ्याने डोलणारी झाडे, विद्युत खांबांपासून दूर राहावे*
2. *पावसात घराबाहेर पडताना काळजी घ्यावी*
3. *झाड कोसळल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास तात्काळ अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा*

सध्या सर्व यंत्रणा अलर्टवर असून, पुढील २४ तास पावसाचा अंदाज लक्षात घेऊन अग्निशमन दल आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने गस्त वाढवली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: