PMC CIC | नदीपात्र स्वच्छतेसाठी ‘जाळी आणि निर्माल्य कलश’ प्रस्तावाला उपसूचनेसह मंजुरी

Homeadministrative

PMC CIC | नदीपात्र स्वच्छतेसाठी ‘जाळी आणि निर्माल्य कलश’ प्रस्तावाला उपसूचनेसह मंजुरी

Ganesh Kumar Mule Jul 04, 2026 8:48 AM

Pune PMC News | अत्यावश्यक सेवांसाठी PMRDA कडून  अमेनिटी  स्पेसमधील मोजक्या जागा तात्काळ ताब्यात घेण्याचा निर्णय
PMC Medical College | महापालिकेच्या मेडिकल कॉलेज मध्ये उभा केला जाणार अटल बिहारी वाजपेयी यांचा अर्धपुतळा!
PMC Employees Promotion | महापालिकेच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती! | शहर सुधारणा समितीची मान्यता

PMC CIC | नदीपात्र स्वच्छतेसाठी ‘जाळी आणि निर्माल्य कलश’ प्रस्तावाला उपसूचनेसह मंजुरी

| शहरभरातील सर्व नदीपात्रांमध्ये अंमलबजावणी; कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – प्रभाग २५ मधील नदीपात्रातील कचरा आणि निर्माल्याची समस्या सोडवण्यासाठी आलेल्या प्रस्तावाला पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीने मूळ प्रस्तावासह एका महत्त्वाच्या उपसूचनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता केवळ प्रभाग २५ नव्हे तर शहरातील सर्व नदीपात्रांमध्ये ही योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (PMC City Improvement Committee)

मूळ प्रस्तावात काय होते?  प्रभाग क्र. २५ च्या सदस्या स्वप्नाली पंडित यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले होते की, नदीपात्रात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि कचरा टाकला जातो. त्यासाठी :   नदीवरील पुलांवर उंच जाळ्या बसवाव्यात, जेणेकरून वरून टाकला जाणारा कचरा थेट नदीत जाणार नाही.   पुलाच्या दोन्ही बाजूस निर्माल्य कलश ठेवावेत, जेणेकरून नागरिक निर्माल्य त्यातच टाकतील.

उपसूचनेनुसार प्रस्तावात काय भर पडली?  या मूळ प्रस्तावावर चर्चा करताना समिती सदस्य श्रीकांत जगताप यांनी उपसूचना मांडली.  सपना छाजेड यांनी त्याला अनुमोदन दिले.
उपसूचनेनुसार, “पुणे महानगरपालिका हद्दीतील नदीपात्रांवर तसेच कॅनॉलवर जाळ्या बसविण्यात याव्यात व निर्माल्य कलश बसवावेत. तसेच कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.”

म्हणजेच आता ही योजना केवळ प्रभाग २५ पुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील नदीपात्र आणि कॅनॉल साठी लागू होणार आहे. तसेच केवळ सुविधा पुरवून न थांबता कचरा टाकणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तरतूदही जोडण्यात आली आहे.

नदी आणि कॅनॉल प्रदूषण रोखण्यासाठी तसेच धार्मिक निर्माल्याचे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा निर्णय नागरिकाभिमुख ठरणार असल्याचे समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: