Vishrantwadi Phulenagar BRTS | पालखीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात ५०० मीटर बीआरटी हटवली | साठे बिस्कीट बस स्थानकासह लेन सेपरेटर काढले

Homeadministrative

 Vishrantwadi Phulenagar BRTS | पालखीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात ५०० मीटर बीआरटी हटवली | साठे बिस्कीट बस स्थानकासह लेन सेपरेटर काढले

Ganesh Kumar Mule Jul 03, 2026 9:04 PM

Nagar Road BRT | नगररोड येथील बीआरटी मार्ग काढल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात! | डॉ सिद्धार्थ धेंडे यांचा आरोप
BRTS on Nagar Road Pune | विमाननगर चौक ते सोमनाथनगर चौक बीआरटी मार्ग काढण्याच्या सूचना | वाहतुक पोलिसांचे महापालिकेला पत्र
Nagar Road BRTS | Removal of Nagar Road BRT route started | The road was closed for three years

 Vishrantwadi Phulenagar BRTS | पालखीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात ५०० मीटर बीआरटी हटवली | साठे बिस्कीट बस स्थानकासह लेन सेपरेटर काढले

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे-आळंदी पालखी महामार्गावरील विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोड दरम्यानचा बीआरटी मार्ग काढण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असून महापालिका आयुक्तांचीही प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात विश्रांतवाडी चौक ते परुळेकर शाळा (शांतीनगर) दरम्यानचा सुमारे ५०० मीटर लांबीचा बीआरटी मार्ग हटवण्यात आला आहे. (Pune PMC News)

३ किमी लांबीचा बीआरटी, ६ बस स्थानके  विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोड दरम्यान सुमारे ३ कि.मी. लांबीचा बीआरटी मार्ग असून त्यामध्ये एकूण ६ बीआरटी बस स्थानकांचा समावेश आहे. संपूर्ण मार्ग टप्प्याटप्प्याने काढण्याचे काम पथ विभागामार्फत नियोजित आहे.

पहिल्या टप्प्यात काय काढले?

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्राधान्याने काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात :  विश्रांतवाडी चौक ते परुळेकर शाळा (शांतीनगर) दरम्यानचा सुमारे ५०० मी. लांबीचा बीआरटी मार्ग हटवला.  साठे बिस्कीट बीआरटी बस स्थानक काढण्यात आले.  दोन्ही बाजूच्या एकूण सुमारे २५० मी. लांबीचे आर.सी.सी. लेन सेपरेटर हटवले.  ७५० मी. लांबीचे लोखंडी ग्रील सेपरेटर काढण्यात आले.  ३५ मी. लांबी व ४ मी. रुंदीचे बीआरटी बस स्थानक पाडण्यात आले.

उर्वरित काम पथ विभाग करणार

मुख्य अभियंता (पथ विभाग) यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित बीआरटी मार्ग काढण्याचे काम पथ विभाग, पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत नियोजित आहे. स्थायी समिती व आयुक्तांची मान्यता मिळाल्याने आता संपूर्ण ३ किमी मार्गावरील बीआरटी हटवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ९ जुलै रोजी पुण्यात मुक्कामी येणार असून आळंदी-पुणे महामार्गावरून मोठ्या संख्येने वारकरी येतात. विश्रांतवाडी चौकात दरवर्षी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. बीआरटी हटवल्याने या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: