PMC Retired Employees | जून महिन्यात पुणे महापालिकेचे १०५ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Retired Employees | जून महिन्यात पुणे महापालिकेचे १०५ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Jun 30, 2026 8:14 PM

PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला २५ लाखांची मदत | विमा योजना अंतर्गत देण्यात आली रक्कम 
PMC Labour Welfare Department | कामगार कल्याण विभाग अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या अधिनस्त! | महापालिका आयुक्त यांनी जारी केले आदेश 
Extension to apply for PMC Gunvant Kamgar Award to Pune Municipal Corporation (PMC) Employees

PMC Retired Employees | जून महिन्यात पुणे महापालिकेचे १०५ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त!

|  कामगार कल्याण विभागातर्फे सेवापूर्ती समारंभात सन्मान

 

PMC Retirement – (The Karbhari News Service) – जून २०२६ महिन्यात पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation) १०५ अधिकारी आणि कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या सर्व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ महापालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिका मुख्य इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये ३० ते ३५ वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन अमित चव्हाण व  महेश मुंडलिक यांनी केले होते. यावेळी कामगार कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी गौरवोद्गार काढले. “तुम्ही केलेली सेवा शहराच्या विकासासाठी मोलाची आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी व आनंदी जावो,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार कल्याण विभागातर्फे असा सेवापूर्ती समारंभ आयोजित केला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेचा सन्मान होतो व नव्या कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: