PMC Sport Scholarship | पुणे महापालिकेची क्रीडा शिष्यवृत्ती योजना २०२५-२६ व २०२६-२७ जाहीर

Homeadministrative

PMC Sport Scholarship | पुणे महापालिकेची क्रीडा शिष्यवृत्ती योजना २०२५-२६ व २०२६-२७ जाहीर

Ganesh Kumar Mule Jun 29, 2026 8:47 PM

MNS Supports BJP | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हेमंत रासने यांना पाठिंबा
Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन
Breaking : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

PMC Sport Scholarship | पुणे महापालिकेची क्रीडा शिष्यवृत्ती योजना २०२५-२६ व २०२६-२७ जाहीर

| जिल्हा ते आंतरराष्ट्रीय खेळाडूंना १० हजार ते ३.५ लाखांपर्यंत आर्थिक मदत

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – जिल्हा, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी पुणे महानगरपालिकेने ‘क्रीडा शिष्यवृत्ती योजना २०२५-२६ व २०२६-२७’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र खेळाडूंना १० हजार रुपयांपासून ३ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख बुधवार १५ जुलै २०२६ आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

कोण करू शकतात अर्ज?

महापालिकेने शिष्यवृत्तीसाठी तीन प्रमुख अटी ठेवल्या आहेत:

रहिवास: पुणे महानगरपालिका हद्दीत मागील ५ वर्षांपासून वास्तव्यास असलेले खेळाडू.  क्रीडा कामगिरी: शासनमान्य स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय किंवा तृतीय क्रमांक मिळवलेले खेळाडू.  उत्पन्न मर्यादा: वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹७ लाखांपेक्षा कमी असलेले खेळाडू.

शिष्यवृत्तीची रक्कम  शालेय / विद्यापीठ स्तर: ₹१०,००० ते ₹३०,०००  खुला गट: ₹२०,००० ते ₹३,५०,०००

आवश्यक कागदपत्रे

५ वर्षांच्या वास्तव्यासंदर्भातील पुरावा

उत्पन्नाचा दाखला

मान्यताप्राप्त जिल्हा क्रीडा संघटनेचे शिफारसपत्र

संबंधित स्पर्धेची प्राविण्य प्रमाणपत्रे

अर्ज कसा व कुठे कराल?  

छापील अर्जाचा नमुना व योजनेबाबत अटी, शर्ती, नियम, निवड प्रक्रिया इ. ची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.pmc.gov.in वर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी खेळाडूंनी क्रीडा विभाग, पुणे मनपा, पंडित नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे ०२ येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महापालिकेने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: