PMC CAFO | मुख्य लेखा व वित्त विभागात कामकाजाची विभागणी | उल्का कळसकर यांच्याकडे खर्च तर घाडगे यांच्याकडे महसूलची जबाबदारी

Homeadministrative

PMC CAFO | मुख्य लेखा व वित्त विभागात कामकाजाची विभागणी | उल्का कळसकर यांच्याकडे खर्च तर घाडगे यांच्याकडे महसूलची जबाबदारी

Ganesh Kumar Mule Jun 25, 2026 7:25 AM

7th Pay Commission | 1 जानेवारी 2016 नंतर मनपा सेवेत रुजू झालेल्या सेवकांना 7 व्या वेतन आयोगाचा तात्काळ लाभ द्या    | मनपा कर्मचारी संघटनांची प्रशासनाकडे मागणी 
PMC Website | वेबसाईट वर माहिती अद्ययावत करण्याबाबत महापालिकेच्या २७ विभागांची उदासीनता! | नगरसचिव, मुख्य लेखा, प्रॉपर्टी टॅक्स, पाणीपुरवठा विभागांचा समावेश
Balasaheb Thackeray Aapala Davakhana | राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

PMC CAFO | मुख्य लेखा व वित्त विभागात कामकाजाची विभागणी | उल्का कळसकर यांच्याकडे खर्च तर घाडगे यांच्याकडे महसूलची जबाबदारी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाच्या कामकाजाची विभागणी करण्यात आली असून, उल्का कळसकर (Ulka Kalskar PMC Cafo) यांच्याकडे खर्च विभागाची तर नव्याने रुजू झालेले भगवान घाडगे (Bhagwan Ghadge PMC Cafo) यांच्याकडे महसूल विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी २४ जून  रोजी याबाबतचे आदेश जारी केले. (PMC Chief Account and Finance Officer)

राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील वित्तीय सल्लागार व उप सचिव भगवान दत्तात्रय घाडगे यांची मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली आहे. त्यांनी २२ जून  रोजी मध्यान्हपूर्वी पदभार स्वीकारला.

आयुक्तांच्या आदेशानुसार कामकाजाची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे:|

उल्का कळसकर | मुख्य लेखा व वित्त अधिकारी (खर्च) | अंदाजपत्रकिय कामकाज

भगवान दत्तात्रय घाडगे | मुख्य लेखा व वित्त अधिकारी (महसूल) | महसूल विषयक कामकाज

दोन्ही पदे शेड्युलमान्य रिक्त जागेवर भरण्यात आली आहेत.

 

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या २९ मे २०२६ व नगर विकास विभागाच्या १७ जून २०२६ च्या शासन आदेशान्वये घाडगे यांची नियुक्ती झाली आहे. घाडगे यांना प्रतिनियुक्तीच्या अटी व शर्तीनुसार वेतन व भत्ते त्यांच्या मूळ विभागाने अदा करावेत, असे आदेशात नमूद आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्याचे निवेदन आयुक्त कार्यालयाकडे सादर करायचे आहे. खातेप्रमुखांनी या आदेशाची नोंद घेऊन पुढील तजवीज करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

उल्का कळसकर यांच्याकडे यापूर्वीपासून खर्च विभागाचे कामकाज आहे. आता भगवान घाडगे यांच्याकडे महसूलची जबाबदारी आल्याने महापालिकेच्या कर वसुली व इतर महसूल विषयक कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: