Bahavni Peth Palakhi | भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसराचा कायापालट सुरू | वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारणार

HomeBreaking News

Bahavni Peth Palakhi | भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसराचा कायापालट सुरू | वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारणार

Ganesh Kumar Mule Jun 22, 2026 5:05 PM

Love Jihad | PMC GB | महापालिका मुख्य सभेत गाजला ‘लव्ह जिहाद’ चा मुद्दा!
PMC Labour Welfare Department | वाढलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे | मुख्य कामगार अधिकारी यांचे आवाहन 
Pune RMC Plants | पुणे महापालिकेकडून 7 RMC प्लांट वर कारवाई 

Bahavni Peth Palakhi | भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसराचा कायापालट सुरू | वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेने अधिग्रहित केलेल्या भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर परिसरातील अनधिकृत आणि जुन्या बांधकामे पाडण्याच्या कामाला आज रोजी सुरुवात झाली. या जागेवर वारकऱ्यांसाठी अधिक प्रशस्त, सुरक्षित आणि सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त असा आधुनिक पालखी विसावा परिसर उभारण्यात येणार आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांना विस्तारित आणि सुकर व्यवस्थेचा लाभ होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

भिमाले यांच्या माहितीनुसार, मंदिर परिसरातील जुनी बांधकामे हटवून त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या निवास, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीसाठी हॉल आणि सुरक्षित मार्गिका यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संतांच्या पालखीला साजेसा सन्मान आणि वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

कामाच्या शुभारंभ प्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष  श्रीनाथ यशवंत भिमाले, नगरसेवक विशाल धनवडे, उपायुक्त माधव जागताप, महापालिकेचे अधिकारी आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, वारकऱ्यांना अधिक सुरक्षित आणि सुकर व्यवस्था देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या लोकहिताच्या कामात सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, ट्रस्टचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

महापालिकेने यंदाच्या वारीपूर्वी कामाचा मोठा भाग पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला असून, उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: