Pune Congress on Smart Meter | स्मार्ट मीटर सक्तीविरोधात पुण्यात काँग्रेसचे तीव्र आंदोलन
| ‘अदानीला फायदा पोहोचवण्यासाठी फडणवीस सरकार सामान्य जनतेला लुटतेय’ – प्रशांत जगताप
Pune News – (The Karbhari News Service) – फडणवीस सरकारने अदानी समूहाला फायदा पोहोचवण्यासाठी पुण्यातील सामान्य नागरिकांवर स्मार्ट मीटरची सक्ती सुरू केली आहे, असा आरोप करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मंगळवारी MSEB मुख्य कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. “स्मार्ट सिटी” बनवण्याचे वचन देऊन सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने आता पुणे शहराला उध्वस्त करून नागरिकांच्या माथी स्मार्ट मीटर मारले आहे, असा थेट आरोप पुणे (पूर्व) शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला. (Pune Breaking News)
रास्ता पेठेतील MSEB मुख्य कार्यालयाच्या बाहेर शेकडो पुणेकर आणि काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. फडणवीस सरकारच्या मनमानी कारभाराचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या वतीने MSEB मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दोन प्रमुख मागण्या मांडल्या:सामान्य जनतेवर लादण्यात येणारी स्मार्ट मीटर सक्ती तातडीने मागे घ्यावी. MSEB कार्यालयाच्या आवारात अदानी कंपनीला देण्यात आले कार्यालय तातडीने हटवावे.
पुणे (पश्चिम) शहराध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्या नेतृत्वातही कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.
प्रशांत जगताप यांनी सांगितले की, “अदानीची तिजोरी भरण्याच्या नादात फडणवीस सरकार सामान्य पुणेकरांची लूट करत आहे. स्मार्ट मीटर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना लुबाडण्याचा डाव आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, MSEB च्या जागेत अदानी कंपनीला कार्यालयासाठी जागा देऊन फडणवीस सरकारने अदानीसमोर थेट लोटांगण घातले आहे. लाखो पुणेकर नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
आंदोलनात नगरसेविका अश्विनी लांडगे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, मजहर मणियार, संगीता पवार, यशराज पारखी, भाऊसाहेब आजबे, द. स. पोळेकर, रमेश सोनकांबळे, सुरेश कांबळे, अविनाश अडसुळ, सुनिल पंडित, संजय कवडे, दिपक ओव्हाळ, चेतन अगरवाल, सतिश पवार, अकबर शेख, वाल्मिक जगताप, दादाश्री कामठे, भगवान कडू, संतोष सुपेकर, अमित कांबळे, माऊली मोरे, पप्पु घोलप, आसिफ शेख, जुबेरबाबु शेख, आयुब पठाण, परवीन तांबोळी, जिनाद सय्यद यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक उपस्थित होते.
काँग्रेसने या मुद्द्यावर रस्त्यावरचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS