NUHM Employees | NUHM कर्मचाऱ्यांच्या पगार, भत्ते आणि आरोग्य सुविधांबाबत आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक | वेळेवर पगार देण्याचे आश्वासन

Homeadministrative

NUHM Employees | NUHM कर्मचाऱ्यांच्या पगार, भत्ते आणि आरोग्य सुविधांबाबत आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक | वेळेवर पगार देण्याचे आश्वासन

Ganesh Kumar Mule Jun 16, 2026 12:40 PM

Whatsapp New feature | एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते वापरता येते
Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 
Assistant Encroachment Inspectors | पुणे महापालिकेकडून भरती केलेल्या ९७ सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या नेमणुका

NUHM Employees | NUHM कर्मचाऱ्यांच्या पगार, भत्ते आणि आरोग्य सुविधांबाबत आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक | वेळेवर पगार देण्याचे आश्वासन

 

Sunil Shinde RMS – (The Karbhari News Service) – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींबाबत राष्ट्रीय मजदूर संघाचे सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत 15 जून  रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेळेवर पगार, भत्ते, बोनस आणि आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. (PMC Health Department)

वेळेवर पगार आणि भत्त्यांचा प्रश्न मार्गी
कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळण्याबत आणि पुढील पगार महिन्याच्या महिन्याला कायमस्वरूपी होण्याबत आयुक्तांनी तातडीने राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावेळी फंड उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले असून, कर्मचाऱ्यांचा मासिक पगार आरबीआयकडून प्रत्येक महिन्याला अदा केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

प्रलंबित असले मासिक व इतर भत्ते, निवडणूक ड्युटीचा निधी, पोलिओ, यूएचएनडी, लसीकरण, सर्वेक्षण आणि टीबी आय भत्ते यापुढे लांबणार नाहीत, असा शब्द आयुक्तांनी दिला. याबत डॉ. मनीषा नाईक यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

बोनस आणि आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा
राष्ट्रीय आरोग्य अभियान शहरी पुणे कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याबत सुनील शिंदे यांनी मुद्दा लावून धरला. त्यावर आयुक्तांनी काही दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सांगून, बोनस कशाप्रकारे देता येईल यासाठी पाठपुरावा घेण्यास सांगितले.

NUHM आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुक्तांनी शहरी गरीब योजना किंवा त्यासारखी दुसरी योजना बजेटमध्ये कशाप्रकारे समाविष्ट करता येईल याबत कळस्कर मॅडम यांना सूचना दिल्या. या योजनेचा खर्च आणि वार्षिक नियोजन याबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.

या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, नगरसेवक सुनील शिंदे, प्र. आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, डॉ. मनीषा नाईक, डॉ. गणेश जगदाळे उपस्थित होते. संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, केअर सेक्टर इनचार्ज मेघा वाघमारे, लक्ष्मण मासाळ, सुप्रिया गवळी, सुनीता सर्वगोड, रेणुका राठोड आणि कविता पाटोळे हे प्रतिनिधी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: