PMC Property tax Department | मिळकतकर विभागातील ८ कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी, एकाला १० हजार दंड!

Homeadministrative

PMC Property tax Department | मिळकतकर विभागातील ८ कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी, एकाला १० हजार दंड!

Ganesh Kumar Mule Jun 09, 2026 9:13 AM

PMC CHS Scheme | आजी-माजी नगरसेवक, पीएमपीएमएल व शिक्षण मंडळ सदस्यांना ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने’चा कायमस्वरूपी लाभ!
Property Tax Recovery | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढूनही टॅक्स विभाग 7 कोटींची वसुली करण्याबाबत उदासीन 
PMPML Bus | उन्हाळाच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद लुटण्यासाठी पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

PMC Property tax Department | मिळकतकर विभागातील ८ कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी, एकाला १० हजार दंड!

| कामचुकारपणा आणि अधिकाराबाहेर काम केल्याने उपायुक्त यांच्याकडून कारवाई

 

PMC Employees – (The Karbhari News Service) –  पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागातील कर्मचाऱ्यांना कामचुकारपणा आणि कामातील बेफिकिरी भोवली आहे. विभागातील ८ कर्मचाऱ्यांच्या विरोधात विभागीय चौकशी (PMC Employees DE)  प्रस्तावित करण्यात आली असून, एका कर्मचाऱ्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी याबत माहिती दिली. (Ravi Pawar PMC)

ज्या ८ कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी लावण्यात आली आहे, त्यांच्याबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मिळकतीचे मूल्यमापन न करणे, प्रकरणे जाणूनबुजून प्रलंबित ठेवणे यामुळे नागरिकांचे आणि पर्यायाने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे उपायुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

चौकशीला सामोरे जाणाऱ्यांमध्ये विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक, अधीक्षक, उप अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे.

एका चौकशीचा खर्च ३२ हजार, म्हणून आर्थिक दंडाचा पर्याय

मिळकत कर विभागाने ८ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र सामान्य प्रशासन विभागाने सांगितले की, एका कर्मचाऱ्याची चौकशी करण्यासाठी ३२ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे आपल्या अधिकारात कर्मचाऱ्यांना आर्थिक दंड करा, असे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना आर्थिक दंड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अधिकार नसताना नाम हस्तांतरण केल्याने कारवाई

औंध क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिक महेश वाघमारे यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वाघमारे यांनी आपल्या अधिकारात नसताना देखील नाम हस्तांतरण प्रकरण केले होते. विशेष म्हणजे हे प्रकरण शिवणे परिसरातील होते, जे त्यांच्या हद्दीतील नव्हते.

त्यामुळे आर्थिक दंडासोबतच वाघमारे यांचा चार्ज काढून त्यांची बदली करण्यात आली आहे.

उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले की, आगामी काळातही कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: