Kothrud Bavdhan Ward Office  – कोथरूड-बावधनमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आणि स्वच्छता रॅलीचा धडाका

Homeadministrative

Kothrud Bavdhan Ward Office – कोथरूड-बावधनमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आणि स्वच्छता रॅलीचा धडाका

Ganesh Kumar Mule Jun 05, 2026 5:57 PM

Pune News | आज दोन महत्त्वाच्या वृक्षतोड प्रस्तावांवर सुनावणी; नदीकाठ सुशोभीकरण व मेट्रो प्रकल्पाचे मुद्दे गाजणार
PMC Sanitation Workers |  जागतिक महिला दिन” निमित्त महिला सफाई कामगारांचा विशेष सन्मान!
PMC Election Voting Awareness | लोक कलेतून साकारला संसदीय लोकशाहीचा जागर | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृतीपर उपक्रम 

Kothrud Bavdhan Ward Office  – कोथरूड-बावधनमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आणि स्वच्छता रॅलीचा धडाका

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण-स्वच्छता प्रभात फेरी आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर असे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. पुणे शहराच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, नगरसेवक प्रतिनिधी, कोथरूड भागातील नागरिक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, स्वच्छ, जनवानी सहकारी संस्था आणि कमिन्स इंडिया लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवण्यात आले. (PMC Solid Waste Management Department)

प्रभाग क्रमांक १०, ११, ३१ मधील गोपीनाथ नगर टेकडी पायथ्याशी जनसेवक अमित तोरडमल यांच्या आयोजनातून वृक्षारोपण कार्यक्रम झाला. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, गिरिश खत्री, क्रीडा समिती सदस्या अल्पना वर्पे, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, डॉ. मनिषा बुटाला, महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या हस्ते रोपटे लावण्यात आले. यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक करण कुंभार, राजेश आहेर, दत्तात्रय दळवी, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, गणेश चोंधे, किरण जाधव, नासिर शेख, ब्रँड अँबेसिडर वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक कांबळे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य

तपासणी शिबिरात २३५ नागरिकांचा सहभाग
कोथरूडमधील थोरात उद्यान, आयडियल कॉलनी, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, शिवतीर्थ नगर, ए.आर.ए.आय. टेकडी, डहाणूकर कॉलनी, भुसारी कॉलनी येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक पृथ्वीराज सुतार, परिमंडल कार्यालय क्रमांक २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ, सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, प्रभाग समितीच्या अध्यक्षा ॲड. वासंती जाधव, नगरसेवक दिनेश माथवड, जनसेवक नवनाथ जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात महिला व पुरुषांच्या बीपी, मॅमोग्राफी, रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. एकूण २३५ नागरिकांनी याचा लाभ घेतला. पर्यावरण-

स्वच्छतेची प्रभात फेरी
सुतारदरा, म्हातोबा नगर, हनुमान नगर, केळेवाडी, किष्किंधा नगर परिसरात पर्यावरण आणि स्वच्छतेची प्रभात फेरी काढण्यात आली. “झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, ओला-सुका कचरा वर्गीकरण करा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांना कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे, जंगल, जल, जमीन यांचे संरक्षण करण्याचे आणि वृक्षतोड टाळण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: