7th  Pay Commission | पुणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता लवकरच | लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक जारी

Homeadministrative

7th  Pay Commission | पुणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता लवकरच | लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक जारी

Ganesh Kumar Mule Jun 02, 2026 7:14 PM

7th Pay Commission : महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना लवकरच 7व्या वेतन आयोगाचा मिळणार लाभ  : सरसकट रक्कम जमा होणार खात्यात 
7th Pay Commission | Pune PMC News | 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हफ्त्याची रक्कम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा | वेतन प्रणालीचे जुने सॉफ्टवेअर आता बंद होणार!
7 th pay commission | 9 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाची भेट | डीएमध्ये 3 टक्के वाढ

7th  Pay Commission | पुणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता लवकरच | लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक जारी

| १२ जूनपर्यंत बिले तपासणीचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सातवा वेतन आयोग आधीच लागू झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्याची रक्कम मिळाल्यानंतर आता पाचव्या हप्त्याची थकबाकीही लवकरच मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक लेखा व वित्त विभागाकडून जारी करण्यात आले आहे. (7th Pay Commission 5th Installment)

कोणाला मिळणार लाभ?

सह महापालिका आयुक्त तथा मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी दि. ०२ जून रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, मनपाचे अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक व मनपा शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाचव्या हप्त्याची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जाणार आहे.

पुणे महानगरपालिकेतील जे अधिकारी, कर्मचारी 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत, अशा अधिकारी, कर्मचारी व मयताचे वारस यांना ७ व्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2016 ते सेवानिवृत्ती दिनांकापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याची बिले १२ जून अखेर ऑडीट विभागाकडून तपासून घ्यायची आहेत.

१२ जूनपर्यंत बिले तपासणीचे आदेश

सातव्या वेतन आयोगानुसार पाचव्या हप्त्याची रक्कम अदा करण्यासाठी संबंधित विभागांनी संगणक प्रणालीद्वारे माहिती व विहित प्रपत्र भरून द्यावेत. ही बिले दि. १२ जून पर्यंत ऑडिट विभागाकडून तपासून घ्यावीत, असे स्पष्ट आदेश कळसकर यांनी दिले आहेत.

सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या हप्त्यासाठी RE35A101B अंतर्गत १३९ कोटी, RE13A102 मध्ये १० कोटी, RE12A103 मध्ये ५ कोटी, XE12G101 मध्ये १० कोटी, XE12P118C मध्ये २० कोटी व XE23F101 मध्ये १२ कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे.

सातव्या वेतन आयोग नियमावली २०१६ नुसार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चार प्रमाणे वचनपत्र घेण्याची जबाबदारी बिल लेखनिकांवर सोपवण्यात आली आहे.

गेल्या चार हप्त्यांनंतर प्रलंबित असलेला पाचवा हप्ता लवकरच मिळणार असल्याने हजारो मनपा कर्मचारी व शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: