Pune Water cut on Thursday | गुरुवारी पुण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Homeadministrative

Pune Water cut on Thursday | गुरुवारी पुण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Ganesh Kumar Mule Jun 01, 2026 7:27 PM

Ashok Kharat Case Pune Protest | मंत्र्यांची चौकशी करा | रुपाली चाकणकरांना अटक करा – पुणे शहर महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन
Mayor Manjusha Nagpure | विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संस्कार, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जोड देणे आवश्यक – महापौर मंजुषा नागपुरे
PMC Property Tax Cheque Bounce | वर्षभरात 32 कोटींचे चेक बाऊन्स | महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्यावर मिळकतकर विभाग करणार कारवाई 

Pune Water cut on Thursday | गुरुवारी पुण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

 

Pune Water cut News – (The Karbhari news Service) –  गोखलेनगर येथील मॅप्को टाकीच्या मुख्य जलवाहिनीला जोडणी करण्याच्या कामामुळे गुरुवार, दि. ४ जून  रोजी पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार, दि. ५ जून  रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.  (PMC Water Supply Department)

का बंद राहणार पाणी?

गोखलेनगर मॅप्को टाकीच्या अखत्यारीतील येणाऱ्या परिसरातील मुख्य जलवाहिनीला जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे टाकीशी संबंधित संपूर्ण वितरण व्यवस्था ४ जून रोजी बंद ठेवावी लागणार आहे.

कोणत्या भागात पाणी बंद?

एस. एन. डी. डी. (एच. एल. आर.) विभाग:  गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंतचा भांगे रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पद्धतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा, विठ्ठल मंदिर परिसर झोनिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा भाग, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत, म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी, टिळेकर प्लॉट, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकर पॉइंट डी.पी. रस्ता, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर, करिष्मा सोसा ते वारजेवार्ड ऑफिस, गिरिजा शंकर, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर, निलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा, स्पर्थ, मधुचूय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल, महिन्म, सुखा, जयशक्ती इत्यादी.
चतु:श्रृंगी टाकी परिसर:  औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसायटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंधगाव परिसर.

नागरिकांना आवाहन

“गुरुवार दि. ४ जून रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवारी सकाळी पाणी उशिरा व कमी दाबाने येईल. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा व महापालिकेस सहकार्य करावे,” असे आवाहन मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका यांनी केले आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: