Pune PMC Retirement | डॉ संजीव वावरे, इनामदार, धुमाळ यांच्यासहित मे महिन्यात पुणे महापालिकेचे 181 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त
PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – मे, 2026 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 181 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे, प्रशासन अधिकारी अनिल धुमाळ, राजेश खंदारे, कार्यकारी अभियंता, हेमंत मोरे, कार्यकारी अभियंता, अधीक्षक, दत्तात्रय नाईक, मुख्याध्यापक, बाबा इनामदार, मुख्य आरोग्य निरीक्षक यांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उप आयुक्त, माधव जगताप, संदीप खलाटे हे उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे राजेश खंदारे, कार्यकारी अभियंता, हेमंत मोरे, कार्यकारी अभियंता, अधीक्षक, डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, प्रशासन अधिकारी अनिल धुमाळ, दत्तात्रय नाईक, मुख्याध्यापक, बाबा इनामदार, मुख्य आरोग्य निरीक्षक, यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप खलाटे यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी महापालिकेला दिलेल्या प्रदीर्घ केलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच माधव जगताप यांनी सेवानिवृत्त सेवकांना त्यांच्या ईच्छा पूर्ण करा, प्रत्येकाने रोज एक तास व्यायाम करा, आपले आरोग्य सांभाळा असे नमूद करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका जोशी व आयोजन अमित चव्हाण यांनी केले.

COMMENTS