Saras Baug Pune | सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ व २९ मे रोजी बंद राहणार

Homeadministrative

Saras Baug Pune | सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ व २९ मे रोजी बंद राहणार

Ganesh Kumar Mule May 27, 2026 8:46 PM

Rajiv Gandhi Zoological Park | Katraj Zoo | पुणे महापालिकेकडून  लहानग्यांना ‘ख्रिसमस गिफ्ट’ | उद्यापासून पुढील 8 दिवस कात्रज झू मोफत पाहण्याची संधी! 
PMC Garden Department | उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पुणे महापालिकेने उद्यानाच्या वेळा वाढवल्या!
PMC Anniversary Exhibition Award | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पो. लि. ला प्रथम पारितोषिक! 

Saras Baug Pune | सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ व २९ मे रोजी बंद राहणार

| शाळांना सुट्टीमुळे गर्दी वाढल्याने निर्णय; पोलीस आयुक्तालयाचा प्रतिबंधात्मक आदेश

 

Pune Saras Baug Closed – (The Karbhari News Service) – शहराच्या मध्यवर्ती भागातील व नागरिकांची कायम वर्दळ असलेले सारसबाग उद्यान गुरुवार, २८ मे आणि शुक्रवार, २९ मे रोजी दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने हा निर्णय घेतला आहे. (PMC Garden Department)

शाळांना सुट्टी, उद्यानात मोठी गर्दी
सारसबाग उद्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिक व लहान मुलांची येथे कायम वर्दळ असते. सध्या शाळांना सुट्टी असल्याने गेल्या काही दिवसांपासून उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांचा प्रतिबंधात्मक आदेश
पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव २८ मे व दि. २९ मे रोजी सारसबाग उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्र. मुख्य उद्यान अधीक्षक संतोषकुमार कांबळे यांनी कळवले आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
दोन दिवस उद्यान बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी ठिकाणांचा वापर करावा व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे. ३० मे पासून उद्यान पुन्हा नागरिकांसाठी नेहमीप्रमाणे खुले करण्यात येईल.
दरम्यान, उन्हाळी सुट्टीमुळे शहरातील सर्वच प्रमुख उद्यानांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे इतर उद्यानांमध्येही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: