Pune MHADA FCFS | पुणे म्हाडाची FCFS सदनिका वितरण प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलली

Homeadministrative

Pune MHADA FCFS | पुणे म्हाडाची FCFS सदनिका वितरण प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलली

Ganesh Kumar Mule May 26, 2026 12:34 PM

Vishwajit Kadam Congress | पुणे काँग्रेसला नवी उभारी देणार; दोन्ही शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन काम करतील:  डॉ. विश्वजित कदम
Pune Helmet News | हेल्मेटसक्तीचा नियम महामार्गांसाठी, शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना त्रास होणार नाही 
Swachha Kasba Abhiyan | स्वच्छ कसबा अभियानात पोलीस खातेही होणार सहभागी – अमितेश कुमार | क्लीन सिटी इंदौरच्या अभ्यास दौऱ्यासाठी १०० सफाई कर्मचाऱ्यांसह दोनशे कार्यकर्ते रवाना

Pune MHADA FCFS | पुणे म्हाडाची FCFS सदनिका वितरण प्रक्रिया पुन्हा पुढे ढकलली

| आचारसंहितेमुळे २८ मे २०२६ रोजीची सोडत रद्द; नवे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावरील सदनिका वितरण प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Breaking News)

२८ मे रोजी होणार होती सोडत
म्हाडा पुणे मंडळामार्फत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका व पीएमआरडीए क्षेत्रातील २०% सर्वसमावेशक व १५% सामाजिक गृहनिर्माण योजनेतील विक्री अभावी रिक्त असलेल्या सदनिकांच्या वितरणाची प्रक्रिया २८ मे २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता नियोजित होती.

आचारसंहितेचा अडथळा
राज्य निवडणूक आयोगाने राज्यात व पुणे जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे नोंदणीकृत अर्जदार व इच्छुक नागरिकांसाठी आयोजित केलेली सोडतीद्वारे वितरण प्रक्रिया तुर्तास पुढे ढकलण्यात येत आहे, असे जाहीर निवेदनात म्हटले आहे.

नवीन तारीख लवकरच
सदर वितरण प्रक्रियेचा सुधारित कार्यक्रम मंडळाद्वारे यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील व मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे.

काय आहे FCFS योजना?
म्हाडाच्या सोडतीत विकल्या न गेलेल्या व रिक्त राहिलेल्या सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केल्या जातात. यामध्ये २०% सर्वसमावेशक व १५% सामाजिक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचा समावेश असतो. अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन थेट सदनिका वाटप केले जाते.

यापूर्वीही पुढे ढकलली होती प्रक्रिया
दरम्यान, प्रशासकीय कारणांमुळे यापूर्वीही म्हाडा पुणे मंडळाची FCFS प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता निवडणूक आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो अर्जदारांना वाट पाहावी लागणार आहे.

संपर्क
अधिक माहितीसाठी नागरिकांनी गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, पुणे येथे किंवा ०२०-२६१२८८६८, २६१२८८५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: