Pune Congress | ‘भाजपच्या धोरणशून्य सत्तेमुळे पुणे हैराण’ : पदभार स्वीकारताच नवनियुक्त अध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

HomeBreaking News

Pune Congress | ‘भाजपच्या धोरणशून्य सत्तेमुळे पुणे हैराण’ : पदभार स्वीकारताच नवनियुक्त अध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Ganesh Kumar Mule May 23, 2026 8:06 PM

Voice of Choice Award | ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने होणार विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान | सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी पार पडणार
Recruitment | महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
Vijaystambh Abhiwadan Sohala | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा

Pune Congress | ‘भाजपच्या धोरणशून्य सत्तेमुळे पुणे हैराण’ : पदभार स्वीकारताच नवनियुक्त अध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

 

Pune News – (The Karbhari News Service) –  ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत काँग्रेसने पुणे शहरात मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. प्रशांत जगताप यांची पुणे पूर्व तर दीप्तीताई चवधरी यांची पुणे पश्चिम शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन येथे दोन्ही नेत्यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. (Pune Breaking News)

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी यांनी सांगितले की, “शहरातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधून आमची नियुक्ती होणे ही खरोखर अभिमानाची बाब आहे. काँग्रेस नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत करू.”

पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नवनियुक्त शहराध्यक्षांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. “पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा असंख्य समस्यांनी पुणेकर हैराण आहेत. पुणे शहराच्या या दुरावस्थेला भारतीय जनता पक्षाची धोरणशून्य सत्ता कारणीभूत आहे,” असा आरोप जगताप यांनी केला.
दीप्ती चवधरी म्हणाल्या, “देशातील जनता महागाईने होरपळली जात आहे. तरुणाई बेरोजगारीने पिचली आहे. शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात भरडला जातोय. मात्र देशाचे पंतप्रधान परदेशात जाऊन चॉकलेट वाटण्यात मग्न आहेत. ही सर्व सत्य परिस्थिती जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.”

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वॉर्ड पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुण्यातील नागरी प्रश्न, बेरोजगारी, महागाई आणि शेतकरी समस्यांवर आवाज उठवून भाजप सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या दोन्ही भागांसाठी स्वतंत्र अध्यक्ष नेमल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या पदग्रहण समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष  मोहनदादा जोशी, प्रदेश प्रवक्ते  तिवारी, महानगरपालिकेतील गटनेते  चंद्रकांत कदम, नगरसेविका दिपाली डोख, नगरसेविका सायरा शेख, नगरसेवक काशिफ सय्यद, मोहसीन शेख, मजहर मणियार, प्रवक्ते हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, महेबूबभाई नदाफ, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक साहिल केदारी, स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे, नगरसेविका अश्विनी लांडगे, नगरसेविका वैशाली भालेराव, उस्मान तांबोळी, प्रदेश सरचिटणीस अमीर शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: