Pune Congress | दोन्ही शहराध्यक्षांचा शनिवारी काँग्रेस भवनात पदग्रहण समारंभ | विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती  

HomeBreaking News

Pune Congress | दोन्ही शहराध्यक्षांचा शनिवारी काँग्रेस भवनात पदग्रहण समारंभ | विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती  

Ganesh Kumar Mule May 22, 2026 7:47 PM

Stamp Duty | Abhay Yojana | मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू
PMC General Body | विधी समितीने मान्य केलेले दोन प्रस्ताव मुख्य सभेने फेटाळले! 
Water use Charges | पाटबंधारे महापालिकेकडून दुप्पट दराने पाणीपट्टी घेणार  | पाटबंधारेचे महापालिकेला पत्र 

Pune Congress | दोन्ही शहराध्यक्षांचा शनिवारी काँग्रेस भवनात पदग्रहण समारंभ | विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  पुणे शहर काँग्रेसची संघटनात्मक फेररचना करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पुणे शहराचे दोन विभाग करून नवीन शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. माजी महापौर प्रशांत जगताप यांची पुणे (पूर्व) शहराध्यक्ष तर माजी आमदार दीप्ती चवधरी यांची पुणे (पश्चिम) शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   (Pune News)

पुणे शहराची व्याप्ती आणि मतदारसंघांची संख्या लक्षात घेता संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी व्हावे यासाठी पूर्व व पश्चिम अशी विभागणी करून दोन स्वतंत्र शहराध्यक्ष नेमण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

शनिवारी पदग्रहण समारंभ

नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत जगताप व दीप्ती चवधरी यांचा पदग्रहण समारंभ शनिवार, 23 मे  रोजी सकाळी 10 वाजता काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे होणार आहे. या समारंभाला माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभास शहरातील सर्व आजी-माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नव्या नेतृत्वासमोरील आव्हाने

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नव्या शहराध्यक्षांसमोर मोठे आव्हान आहे. गटबाजी संपवून संघटना मजबूत करणे, बूथ पातळीपर्यंत पक्ष बांधणी करणे आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांशी समन्वय राखणे ही कामे नव्या पदाधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत.

प्रशांत जगताप हे माजी महापौर असून त्यांना महापालिकेतील प्रशासनाचा व संघटनेचा दीर्घ अनुभव आहे. तर दीप्ती चवधरी या महिला काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय असून आमदार, नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पुणे शहरात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी ही नवी रचना कितपत यशस्वी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: