MP Nilesh Lanke | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील 6 वर्षीय मुलीच्या मृत्यूची मनपाने चौकशी करावी: खासदार निलेश लंके यांची मागणी

Homeadministrative

MP Nilesh Lanke | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील 6 वर्षीय मुलीच्या मृत्यूची मनपाने चौकशी करावी: खासदार निलेश लंके यांची मागणी

Ganesh Kumar Mule May 22, 2026 7:34 PM

Deenanath Mangeshkar Hospital | महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास दिलेल्या सर्व  सवलती रद्द करण्याची मागणी 
PMC Health Department on Deposit | अनामत रकमेवरून पुणे महापालिका आरोग्य विभागाची शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स, रुग्णालये आणि नर्सिंग होम्स ना नोटीस!
NCP – SCP  Pune | दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत निषेध आंदोलन 

MP Nilesh Lanke | दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील 6 वर्षीय मुलीच्या मृत्यूची मनपाने चौकशी करावी: खासदार निलेश लंके यांची मागणी

: अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना निवेदन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान 6 वर्षीय कु. प्रियंशी बागडे हिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी पुणे महापालिकेने सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. (PMC Health Department)

खासदार लंके यांनी म्हटले आहे की, या घटनेमुळे रुग्णालयाची कार्यपद्धती, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, रुग्ण सुरक्षा आणि प्रशासकीय उत्तरदायित्व याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रकरण एका दुर्दैवी मृत्यूपुरते मर्यादित नसून नागरिकांची सुरक्षा व नागरी नियमांचे पालन यांच्याशी संबंधित आहे.

बांधकामापासून थकबाकीपर्यंत सर्वांची तपासणी करा  निवेदनात लंके यांनी पुढील मुद्द्यांवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे:

बांधकाम परवाने: इमारतीचे अधिकृत परवाने, मंजूर नकाशे व प्रत्यक्ष बांधकाम यांची पडताळणी करावी.  अनधिकृत बदल: अनधिकृत बांधकाम, अतिरिक्त मजले किंवा नियमबाह्य संरचनात्मक बदल झाले आहेत का, याची विशेष तपासणी करावी. स्ट्रक्चरल ऑडिट: इमारतीचे स्वतंत्र व अधिकृत स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षितता प्रमाणित करावी.  फायर व ICU सुरक्षा: फायर सेफ्टी, ICU व ऑपरेशन थिएटर विभागातील सुरक्षा नियमांची विशेष तपासणी करावी. परवानग्या व प्रमाणपत्रे: मनपाकडून मिळालेल्या सर्व परवानग्या व सुरक्षा प्रमाणपत्रांचे पालन होते का, याची चौकशी करावी.नागरी सुविधा: वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सार्वजनिक प्रवेशमार्ग व नागरी सुविधा नियमांचे पालन तपासावे. कठोर कारवाई: नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी.

32 कोटींची थकबाकीही चौकशीच्या रडारवर

संबंधित रुग्णालयाकडे पुणे महापालिकेची सुमारे 32 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. या थकबाकीच्या वसुली प्रक्रियेची व त्यासंबंधीच्या प्रशासकीय बाबींचीही चौकशी करावी, अशी मागणी लंके यांनी केली आहे.

निवेदन देताना खासदार निलेश लंके यांच्यासोबत प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, ऋषिकेश बालगुडे, नगरसेवक योगीराज गाडे, सूरज मोरे, विक्रम ननावरे, रणजित दळवी, अमोघ ढमाले उपस्थित होते.

प्रियंशी बागडे हिच्या मृत्यूनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: