Balewadi Garbage Collection Center | बालेवाडी परिसरातील कचरा संकलन केंद्राच्या जागेचा मार्ग मोकळा

Homeadministrative

Balewadi Garbage Collection Center | बालेवाडी परिसरातील कचरा संकलन केंद्राच्या जागेचा मार्ग मोकळा

Ganesh Kumar Mule May 15, 2026 9:25 AM

Pune PMC News | ऑडिट उपसमिती वर ८ तर अपील उपसमिती वर ७ सदस्यांची नियुक्ती!
PMC CHS Scheme | आजी-माजी नगरसेवक, पीएमपीएमएल व शिक्षण मंडळ सदस्यांना ‘अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने’चा कायमस्वरूपी लाभ!
PMC Standing Committee Chairman | या पंचवार्षिक मध्ये सर्वच स्थायी समिती अध्यक्षांना बजेट सादर करून त्यावर अंमल करण्याची संधी!

Balewadi Garbage Collection Center | बालेवाडी परिसरातील कचरा संकलन केंद्राच्या जागेचा मार्ग मोकळा

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – बालेवाडी परिसरातील कचरा संकलन केंद्रासाठी जागेअभावी निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता पीएमपीएमएलच्या बस डेपोमधील मोकळी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य मयुरी कोकाटे यांनी केली होती. या मागणीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Shrinath Bhimale PMC)

सध्या बालेवाडी सर्व्हिस रस्त्यालगत असलेल्या कचरा संकलन केंद्रावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असून जागा अपुरी पडत आहे. हे केंद्र राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना उघड्यावरच कचरा संकलनाचे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्य धोक्यात आले होते.

मुंबई-पुणे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्यालगत कचरा साचलेला दिसत असल्याने महापालिकेच्या स्वच्छतेबाबत नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याचेही कोकाटे यांनी नमूद केले आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथील पीएमपीएमएल बस डेपोमधील सुमारे ३००० चौरस फुट जागा कचरा संकलन केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे कचरा व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध होईल तसेच रस्त्यावर कचरा दिसणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: