PMC School Students | विद्यार्थ्यांना १ जून लाच साहित्य खरेदीसाठी दिली जाणार रक्कम!

Homeadministrative

PMC School Students | विद्यार्थ्यांना १ जून लाच साहित्य खरेदीसाठी दिली जाणार रक्कम!

Ganesh Kumar Mule May 09, 2026 8:03 AM

State Election Commission | राज्य निवडणूक आयोगा कडू महापालिका क्षेत्रात लागू आदर्श आचारसंहिता संपुष्टात! 
10th Results | सफाई सेविका सुवर्णा पवार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून झाल्या १० वी पास | प्रशासनाने केला विशेष सन्मान
Pune Road Devlopment | पुण्याच्या रस्ते विकासातील २ मोठे अडथळे दूर! | अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती 

PMC School Students | विद्यार्थ्यांना १ जून लाच साहित्य खरेदीसाठी दिली जाणार रक्कम!

 

PMC DBT – (The Karbhari News Service)  – यंदा एक जून लाच पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षण विभाग माध्यमिक व तांत्रिक विभाग या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य साठी त्यांच्या बँक खात्यावर रोख रक्कम जमा केली जाणार आहे. याबाबत स्थायी समिती च्या बैठकीत आदेश दिले आहेत. अशी माहिती समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (PMC Standing Committee)

महापालिका शाळेतील सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी डीबीटी च्या माध्यमातून रक्कम दिली जाते. मात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर ही रक्कम मिळते. त्यामुळे साहित्य खरेदी करण्यात उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत होते. तसेच महापालिका प्रशासनाला देखील टीकेचा सामना करावा लागतो.

यंदा हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना १ जून लाच ही रक्कम देण्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच प्रशासनाला आदेश देण्यात आले कि ही रक्कम जमा केली जावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान यात प्रशासनाने हयगय करू नये. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: