PMC Financial Committee | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील १ कोटी पर्यंतच्या कामास वित्तीय समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही!

Homeadministrative

PMC Financial Committee | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील १ कोटी पर्यंतच्या कामास वित्तीय समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही!

Ganesh Kumar Mule May 08, 2026 7:17 PM

Pune Breaking News | वाहतुकीच्या मुख्य ३२ रस्त्यांसाठी मनपाद्वारे ३२ आणि पोलीस विभागाद्वारे ३२ अधिकारी समन्वयक
PMC Officers Transfer | अभियांत्रिकी संवर्गातील मुख्य आणि अधिक्षक अभियंता यांच्या बदल्या | महापालिका आयुक्त यांचे आदेश
Sunil Shinde | NUHM कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून वेतन थकीत |  राष्ट्रीय मजदूर संघ आणि नगरसेवक सुनील शिंदे यांचा महापालिका आयुक्तांना इशारा

PMC Financial Committee | क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील १ कोटी पर्यंतच्या कामास वित्तीय समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही!

| महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

 

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या मुख्य सभेत वित्तीय समिती रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार आता महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात येणाऱ्या कामाबाबत आदेश जारी केले आहेत.  आता क्षेत्रीय कार्यालयाकडून आलेल्या १ कोटी पर्यंतच्या कामास वित्तीय समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही. असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)

पुणे महापालिकेच्या विविध विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात विकास कामे केली जातात. मात्र विकासकाम करण्यासाठी वित्तीय समितीच्या मान्यतेची अट ठेवण्यात आली होती. यावरून नुकताच नगरसेवकानी मुख्य सभेत विरोध केला होता. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले होते कि, कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी समिती आवश्यक आहे. मात्र आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केल्या जाणाऱ्या 1 कोटी पर्यंतच्या कामांना वित्तीय समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही, असे महापालिका आयुक्त यांनी म्हटले आहे.

तसेच आता यापुढे कामांचे पूर्वगणनपत्रक तयार करणे, मान्यता घेणे, अशी कामे प्रचलित पद्धतीचा अवलंब करून लवकरात लवकर पूर्ण करावीत. असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: