Vivek Velankar on PMC | पुणेकरांना त्रास देणाऱ्या कंपनीला पुन्हा मोठे कंत्राट कशासाठी? | विवेक वेलणकर यांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

Homeadministrative

Vivek Velankar on PMC | पुणेकरांना त्रास देणाऱ्या कंपनीला पुन्हा मोठे कंत्राट कशासाठी? | विवेक वेलणकर यांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

Ganesh Kumar Mule Apr 28, 2026 12:32 PM

PMC Pune | सेवा वाहिन्यांच्या प्रलंबित कामामुळे रस्ता दुरुस्तीचे टेंडर रखडले
Pune Hawkers | फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ
Uruli Devachi and Fursungi | उरुळी देवाची आणि फुरसुंगी महापालिकेतच राहू द्या | महापालिका राज्य सरकारला देणार आपला अभिप्राय

Vivek Velankar on PMC | पुणेकरांना त्रास देणाऱ्या कंपनीला पुन्हा मोठे कंत्राट कशासाठी? | विवेक वेलणकर यांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासन आणि पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करायला लावणाऱ्या कंपनीला पुन्हा मोठे कंत्राट कशासाठी? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना केला आहे. (PMC Standing Committee)

वेलणकर यांनी याबाबत अध्यक्ष यांना पत्र दिले आहे. त्यानुसार पुणे महापालिका अंतर्गत मिळकतींचे जी आय एस मॅपिंग चे काम २०१६ साली सार आय टी रिसोर्सेस प्रा. लिमिटेड या कंपनीस देण्यात आले. या कंपनीने चुकीच्या पद्धतीने काम करून हजारो पुणेकरांची मिळकतकरातील ४०% सवलत रद्द केली. यातून नागरीकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आणि गेली चार वर्षे या चुका निस्तरताना नागरीक आणि मनपा प्रशासन दोघांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

वेलणकर यांनी पुढे म्हटले की, पीटी ३ फाॅर्म भरुन मिळकत करात दुरुस्ती करण्याचे काम आजही सुरुच आहे. महापालिकेने नेमलेल्या समितीने या कंपनीने केलेल्या कामाचा छोटा सर्व्हे केला होता आणि या कंपनीने ८८% ठिकाणी चुका केल्याचा अहवाल या समितीने दिला होता व त्याआधारे महापालिकेने सदरहू कंपनीचे बिल , सुरक्षा ठेव व बॅंक गॅरंटी मिळून जवळपास १२ कोटी रुपये जप्त करण्याचा निर्णय घेतला.

अशा कंपनीला महापालिकेने पुन्हा कोणतेही काम देणे अपेक्षित नसताना पुणे महापालिकेने प्रशासक राज संपता संपता फेब्रुवारी २०२६ मध्ये या कंपनीला पुणे शहरातील वृक्षगणनेचे तब्बल ३० कोटी रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतला. सध्या स्थायी समितीने अशा सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये सदरहू कंपनीचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: