PMC JE RR | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या सेवा नियमात बदल करण्याची मागणी 

Homeadministrative

PMC JE RR | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या सेवा नियमात बदल करण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 27, 2026 8:43 PM

Old pension | आत्ता सेवानिवृत्त नंतर मिळेल जुन्या पेन्शन प्रमाणे ग्रॅज्युएटी | आत्ता संघर्ष हा सेवानिवृत्त नंतर मिळणाऱ्या पेन्शन साठी
Pramod Bhangire | प्रभाग ४१ चे टँकरमुक्तीच्या दिशेने ठोस पाऊल | प्रमोद नाना भानगिरे यांच्या पाठपुराव्या नंतर प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन 
Mumbai-Pune Expressway | उद्या पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद 

PMC JE RR | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या सेवा नियमात बदल करण्याची मागणी

| शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव

 

PMC Recruitment Rules – (The Karbhari News Service) – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या सेवा नियमात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत भाजप नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव ठेवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, कनिष्ठ अभियंता यांना २५% पदोन्नती देण्यात यावी आणि ७५ % सरळसेवा भरती च्या माध्यमातून उमेदवार घेतले जावेत. यावर समितीच्या येणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (PMC Junior Engineer Promotion)

 

पुणे महापालिकेच्या  आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता, उप अभियंता  तसेच कनिष्ठ अभियंता  या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला  राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना २५% च्या ऐवजी १५% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर ७५% च्या ऐवजी ८५ % सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.

दरम्यान या सेवा नियमात बदल करण्याची मागणी करत पूर्वीप्रमाणे हा नियम करावा, अशी मागणी सुतार यांनी केली आहे. सुतार यांनी म्हटले आहे कि, नामनिर्देशन म्हणजे सरळसेवा भरती  ७५% ठेवली जावी. तर पदोन्नती २५% ठेवली जावी. त्यासाठी अर्हता ही  AICTE मान्यताप्राप्त विद्यापिठाची  अभियांत्रिकी शाखेची पुर्ण वेळ पदवी / पदवीका उर्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदोन्नती साठी नामनिर्देशनासाठी विहित करण्यात आलेली शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या पुणे मनपाच्या आस्थापनेवरील सेवाजेष्ठतेच्या आधारे कार्यरत कर्मचाऱ्यांची किमान ५ वर्षे सेवा असणे आवश्यक, असे म्हटले आहे.

सेवा नियमात हा बदल करून हा प्रस्ताव राज्य सरकार कडे मंजुरी साठी पाठवावा, असे देखील सुतार यांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. सत्ताधारी नगरसेवकांचा हा प्रस्ताव असल्याने आता यावर येत्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: