PMC Reinstatement Works शहरातील रिइंस्टेटमेंट अर्थात खोदकामानंतरची पुनर्स्थापना कामे आता फक्त पथ विभागच करणार!
| विविध विभागांच्या कामाबाबत नाराजी दर्शवत आयुक्तांनी ठरवून दिली नियमावली
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – शहरातील रस्ता खोदकामानंतरच्या पुनर्स्थापना (Reinstatement) कामांबाबत महापालिका आयुक्त यांनी विविध विभागावर नाराजी दर्शवली आहे. तसेच या कामांबाबत एक नियमावली ठरवून दिली आहे. त्यानुसार आता ही कामे फक्त पथ विभागच करणार आहे. त्यासाठी विभागांकडून रस्ते विभागास अर्थसंकल्पीय तरतूद (Budget Locking) उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. (PMC Raod Department)
पुणे महानगरपालिका हद्दीत विविध विभागांकडून ( पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत इ.) अत्यावश्यक सेवांसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संबंधित विभागांकडून करण्यात येणारी पुनर्स्थापना (Reinstatement) समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने एकाच विभागामार्फत खोदकामानंतर रस्त्यांची पुन:र्स्थापना (Reinstatement) केल्यास कामे दर्जेदार आणि विहित मुदतीत होऊन वाहतूक सुरळीत राहून नागरिकांना सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध होतील. असे मत आयुक्तांनी नोंदवले आहे. त्यानुसार आयुक्तांनी नियमावली ठरवून दिली आहे.
त्यानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत रस्ता खोदाईनंतर करण्यात येणारी सर्व रस्ता पुनः र्स्थापना कामे (Reinstatement Works) ही केवळ पथ विभागामार्फतच करण्यात येतील. सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रस्ता खोदकामासंदर्भात : पुन:र्स्थापना कामांसाठी आवश्यक निधी त्यांच्या विभागाच्या अंदाजपत्रकातून पूर्वनियोजित (Budget Locking) करून रस्ता विभागाकडे उपलब्ध करून द्यावा. कोणत्याही विभागास स्वतंत्रपणे पुनःर्स्थापना कामे (Reinstatement) करण्यास मुभा राहणार नाही. सर्व पुन:र्स्थापना कामे गुणवत्ता व एकसंधता राखण्यासाठी रस्ता विभागामार्फतच करण्यात येतील. संबंधित विभागांनी रस्ता खोदकामासाठी परवानगी घेण्यापूर्वी पुन:र्स्थापना खर्चाचा अंदाज निश्चित करावा. आवश्यक निधी उपलब्ध असल्याची खात्री करावी. रस्ते खोदाई करणेच्या ठिकाणी बॅरिकेटससह अन्य सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची दक्षता सबंधित खोदाई करणाऱ्या विभागाच्या अभियंत्यांनी घ्यावी.
आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे कि, पथ विभागाने पुन:र्स्थापना कामांसाठी सद्याची मानक कार्यपद्धती (SOP) सुधारित करावी. एसओपी नुसार कामे पार पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून पात्र व सक्षम कंत्राटदारांची नियुक्ती करावी. सर्व संबंधित विभागांनी एकमेकांमध्ये आवश्यक समन्वय ठेऊन रस्ते पूर्ववत करण्याची कामे दर्जेदार पद्धतीने, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांचे पालन करून विहित मुदतीत पूर्ण करून घेऊन आधीच्या आणि नंतरच्या त्याच अन्गेल मधून काढलेल्या फोटोसह नियमित MIS अहवाल अद्ययावत सादर करावा. असे आयुक्तांनी म्हटले आहे.

COMMENTS