Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!

Homeadministrative

Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!

Ganesh Kumar Mule Apr 22, 2026 9:32 PM

PMC Kids Festival | मुक्त खेळ आणि पालक कल्याणाचा उत्सव याकरिता अर्बन ९५ पुणे किड्स फेस्टिव्हल २०२४ चा उद्घाटन समारंभ संपन्न
Dr. Vasant Gawde | NSS | एन.एस.एस. हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ | प्रा.डॉ. वसंत गावडे
Supriya Sule News Update | Chandrakant Patil | सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांची दिलगिरी 

Pune Property Tax | फक्त महिलांच्या नावे असलेल्या मिळकतींना मिळकतकरात ५०% सवलत | घोषणेचा गाजावाजा भरपूर; अटी मात्र भरमसाठ!

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे मनपा हद्दीतील फक्त महिलांच्या नावे असलेल्या पाचशे स्क्वे. फुटापर्यंतच्या एका निवासी मिळकतींला मिळकतकरात ५०% सवलत देणेबाबत स्थायी समिती अध्यक्ष  श्रीनाथ भिमाले यांनी अंदाजपत्रकावरील भाषणादरम्यान  घोषणा केली होती. आता या योजनेचा लाभ देण्याबाबत प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे. या घोषणेचा गाजावाजा भरपूर केला असला तरी यात खूप साऱ्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात किती नागरिकांना याचा लाभ होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रस्तावावर उद्या होणाऱ्या समितीच्या बैठकीत चर्चा होईल. (PMC Budget 2026-27)

पुणे मनपा हद्दीतील फक्त महिलांच्या नावे असलेल्या पाचशे स्क्वे. पुटापर्यंतच्या एका निवासी मिळकतीला मिळकतकरात ५०% सवलत देणेबाबतचा प्रस्ताव  स्थायी समितीच्या मार्फत  मुख्य सभेकडे मान्यतेस्तव सादर करण्यात आला आहे.  मुख्य सभेच्या  मान्यतेनंतर हा प्रस्ताव  अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.

प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे कि, पुणे मनपा हद्दीतील फक्त महिलांच्या नावे असलेल्या ५०० स्के. फुटापर्यंतच्या एका निवासी मिळकतींची संख्या अंदाजे ७० हजार ७७३ असून त्याची मिळकतकराची अंदाजे रक्कम  ४०.४८ कोटी आहे. त्यापैकी ५०% करमाफी केल्याने अंदाजे २० कोटी इतका मिळकतकराद्वारे मिळणारे उत्पन्न कमी होणार आहे. या प्रकरणी मुख्य विधी अधिकारी यांचा अभिप्राय मागविण्यात आलेला असून तो अद्याप अप्राप्त आहे. असे असले तरी नियमाचा आधार घेत सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी या अटी व शर्ती लागू राहतील

– ३१ मार्च २०२५ रोजी ज्या मिळकती महिलांच्या नावावर नोंद असतील, त्यांनाच सदर योजनेचा लाभ दिला जाईल.

– ही योजना केवळ आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील चालू मागणीपुरती मर्यादित राहील.

– १ एप्रिल २०२६ पूर्वीच्या थकबाकीवर योजना लागू राहणार नाही.

– योजनेअंतर्गत व्याज, दंड व शास्ती यांवर कोणतीही सवलत देय राहणार नाही.

– महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम २६७ (अ) अन्वये अनधिकृत मिळकतींवर ‘लागू शास्ती कायम राहील. तसेच, भविष्यात महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भात कोणतेही नियम/निकष अधिसूचित झाल्यास ते संबंधित प्रकरणी लागू राहतील.

– ज्या मिळकतींना विद्यमान महानगरपालिका धोरणानुसार ४०% सवलत लागू आहे, त्या मिळकतींसाठी ५०% सवलती ऐवजी २५% सवलत  राहील.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: