PMC JE Bharti Exam 2026 | ४ शहरात ६ परीक्षा केंद्रावर ८ हजारहून अधिक उमेदवारांनी दिली परीक्षा! 

Homeadministrative

PMC JE Bharti Exam 2026 | ४ शहरात ६ परीक्षा केंद्रावर ८ हजारहून अधिक उमेदवारांनी दिली परीक्षा! 

Ganesh Kumar Mule Apr 22, 2026 6:18 PM

Pradhan Mantri National Child Award | प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार
Daund MlA Rahul Kul News | पुणे महापालिकेकडून मुठा उजव्या कालव्यात सोडण्यात येत असलेले सांडपाणी बंद करण्याची मागणी 
Vidhansabha Election 2024 | शरद पवारांची विधानसभा निवडणुकीत आघाडी | पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले

PMC JE Bharti Exam 2026 | ४ शहरात ६ परीक्षा केंद्रावर ८ हजारहून अधिक उमेदवारांनी दिली परीक्षा!

| अजून दोन दिवस चालणार परीक्षा

 

PMC JE Recruitment – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  यासाठीची परीक्षा एकूण ३ दिवस म्हणजे २२, २३ आणि २९ एप्रिल अशी परीक्षा चालणार आहे. त्यानुसार आज म्हणजे २२ एप्रिल ला ४ शहरात ६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. ८ हजारहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली. आजची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली. (Pune Municipal Corporation Recruitment 2026)

नागपूर, अमरावती, नांदेड आणि संभाजी नगर अशा ४ शहरात बुधवारी परीक्षा घेण्यात आली. गुरुवारी ७ शहरात १२ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर, अमरावती, नांदेड आणि संभाजी नगर याशिवाय पुणे, मुंबई आणि कोल्हापूर शहराचा समावेश आहे. पुणे शहरात तीन परीक्षा केंद्र असणार आहेत. मुंबईत दोन तर कोल्हापुरात एक परीक्षा केंद्र असणार आहे. २९ एप्रिल देखील याच ७ शहरात १२ केंद्रावर परीक्षा होणार आहे. असे थोरात यांनी सांगितले.

बुधवारी दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. सकाळी ९ ते ११ आणि दुपारी १ ते ३ अशी परीक्षा घेण्यात आली. २३ आणि २९ एप्रिल ची परीक्षा तीन सत्रात घेतली जाणार आहे. सकाळी ९ ते ११, दुपारी १ ते ३ आणि सायंकाळी ५ ते ७ अशी वेळ असणार आहे. महापालिका प्रशासनाने १०० उमेदवारामागे एक पर्यवेक्षक नियुक्त केला आहे. त्यानुसार बुधवारी ९० कर्मचारी आणि अधिकारी यांची टीम तैनात होती.

थोरात यांनी सांगितले कि, परीक्षा पार पडल्यानंतर पुढील महिनाभरात निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी करून उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. म्हणजे आगामी दोन महिन्यात नवीन कर्मचारी महापालिकेला मिळणार आहेत.

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत. तर आता एकूण अर्ज हे ४२ हजार ३२ इतके झाले आहेत.

 

—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0