Shrinath Bhimale on Pune Traffic | कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजनांना गती  | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Homeadministrative

Shrinath Bhimale on Pune Traffic | कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजनांना गती | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Ganesh Kumar Mule Apr 21, 2026 8:59 PM

PMC Financial Committee | वित्तीय समितीमुळे शहराचे नुकसान झाले असेल तर समिती रद्द करू | महापालिका आयुक्त नवल किशोर राम 
PMC Election Code of Conduct | पुणे महापालिका आयुक्तांकडून आचारसंहिते बाबत आदेश जारी 
Naval Kishore Ram IAS | पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी बदलीची कारवाई!

Shrinath Bhimale on Pune Traffic | कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजनांना गती

| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Pune PMC News – (The karbhari News Service) – कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांना गती देत असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

श्रीनाथ भिमाले आणि महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज या परिसरातील नियोजित वाहतूक प्रकल्पांची पाहणी केली. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माधव जगताप, बनकर साहेब, मनीषा शेकटकर,नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भिमाले म्हणाले, “शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, मुंढवा आणि केशवनगर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आयटी पार्क, नव्या निवासी प्रकल्पांची वाढ आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
विशेषतः मुंढवा येथील महात्मा फुले चौक, कल्याणी नगर–कोरेगाव पार्क मार्ग आणि अगा खान ब्रिज परिसर हे मुख्य बॉटलनेक ठरत आहेत. सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागून प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून काही महत्त्वाच्या उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. कल्याणी नगर–कोरेगाव पार्क दरम्यान नवीन नदीवरील पूल उभारण्याचे काम सुरू असून काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणही करण्यात येत आहे. तसेच मुंढवा चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ₹१२६ कोटींच्या फ्लायओव्हर प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय हडपसर–मुंढवा–केशवनगर मार्गावरही नवीन पूल आणि रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहेत.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: