PMC E Learning School | समाविष्ट  २३ गावातील महापालिकेच्या शाळांमध्ये दिले जाणार ई लर्निंग चे धडे!

Homeadministrative

PMC E Learning School | समाविष्ट  २३ गावातील महापालिकेच्या शाळांमध्ये दिले जाणार ई लर्निंग चे धडे!

Ganesh Kumar Mule Apr 18, 2026 2:40 PM

PMC Employees Transfer | गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मिळाला मुहूर्त | महापालिका कर्मचाऱ्यांनी टाकला सुटकेचा निश्वास! 
PMC Deep Clean Drive | डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून एकूण ९२ टन ओला कचरा, १३३ टन सुका कचरा, ८३७ टन राडारोडा व ७७ टन पालापाचोळा संकलित | महापालिका प्रशासनाचे सकारात्मक पाऊल
PMC Pune Budget 2026-27 | पीएमपी बळकटीकरणावर भर | मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा | ५४ किमी भुयारी रस्ते

PMC E Learning School | समाविष्ट  २३ गावातील महापालिकेच्या शाळांमध्ये दिले जाणार ई लर्निंग चे धडे!

| शिक्षण समिती च्या बैठकीत प्रस्ताव मान्य

 

PMC Education Committee – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या धर्तीवर समाविष्ट २३ गावातील महापालिकेच्या ६५ शाळांमध्ये संगणक कक्ष उपलब्ध करून देऊन ई लर्निंग चे शिक्षण दिले जाणार आहे. याबाबत शिक्षण समितीच्या बैठकीत प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. मुख्य सभेच्या मान्यतेनंतर यावर अंमल केला जाणार आहे. (PMC Primary Education Department)

कॉंग्रेस चे नगरसेवक अरविंद  शिंदे व  कासिफ फकरूल सय्यद यांनी याबाबत शिक्षण समिती समोर प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभाग, कडून सर्व माध्यमाच्या शाळामधील विद्यार्थ्यांना प्रगत संगणक शिक्षण उपलब्ध होण्यासाठी दैनदिन जीवनात अग्रेसर राहण्यासाठी उपयुक्त अश्या सोई सुविधा पुरविण्याकरीता पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या कडून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये संगणक कक्ष निर्माण करून संगणकाद्वारे (E-learning) शिक्षण दिले जात आहे. याच धर्तीवर समाविष्ट २३ गावातील ६५ शाळांमध्ये संगणक कक्ष उपलब्ध करून (E-learning) शिक्षण दिले जावे. वरील सर्व कामे पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६-२०२७ सुरु होणे पूर्वी करण्यात यावी. हा प्रस्ताव नुकताच समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. यावर आता मुख्य सभेची मोहोर लागल्यानंतर अंमल केला जाणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: