Pune Property Tax | ज्येष्ठ नागरिकांना मिळकत करात ३०% सवलत मिळण्याचा मेसेज चुकीचा | मिळकत कर विभागाचे स्पष्टीकरण 

Homeadministrative

Pune Property Tax | ज्येष्ठ नागरिकांना मिळकत करात ३०% सवलत मिळण्याचा मेसेज चुकीचा | मिळकत कर विभागाचे स्पष्टीकरण 

Ganesh Kumar Mule Apr 18, 2026 2:03 PM

Announcement of Higher Education Minister | ‘कोरोना पास’ शिक्का बसलेल्यांसाठी राज्य सरकारचा मदतीचा हात |उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
NCP Youth Congress | महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..? | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन
PMPML Pass | पीएमपीएमएल कडून “फिरते पास केंद्र” उपक्रमाची सुरुवात!

Pune Property Tax | ज्येष्ठ नागरिकांना मिळकत करात ३०% सवलत मिळण्याचा मेसेज चुकीचा | मिळकत कर विभागाचे स्पष्टीकरण

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – सोशल मिडियावर विशेषतः whatsapp वर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या निवासी मालमत्तेवर ३०% मालमत्ता कर सवलत मिळते, अशा प्रकारचे संदेश प्रसारित होत आहेत. या  संदेशामध्ये नमूद केलेली माहिती अचूक नसून, कोणत्याही अधिकृत शासन निर्णयावर आधारित नाही. असा खुलासा महापालिका मिळकत कर विभागाकडून करण्यात आला आहे. (Property Tax Discount)

विभागाने म्हटले आहे कि, महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये अशा प्रकारची ३०% सरसकट सवलत देण्याबाबत कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. तसेच, अशा सवलतीसाठी कोणतीही राज्यस्तरीय योजना अस्तित्वात नाही. ज्येष्ठ नागरिकांनी अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. मालमत्ता कर सवलती संदर्भातील कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या नजिकच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घ्यावी.

—-

सोशल मिडियावर प्रसारित होत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याने नागरिकांनी ती पुढे पाठवू नये, तसेच अफवांपासून सावध राहावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

| रवी पवार, उप आयुक्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: