PMC Standing Committee | महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्थायी समिती सदस्य व  अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन! | महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना सुचवणार समिती

Homeadministrative

PMC Standing Committee | महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्थायी समिती सदस्य व  अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन! | महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना सुचवणार समिती

Ganesh Kumar Mule Apr 16, 2026 9:08 PM

Shetkari Athvade Bajar | शेतकरी आठवडे बाजारासाठी पुणे महापालिकेकडून नियमावली!
Khadakwasla – Kharadi Metro | खडकवासला – खराडी मेट्रो | साडेआठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित  | महामेट्रोकडून महापालिकेस प्रारूप आराखडा सादर
Pune Municipal Corporation Security Guard | Pune Municipal Corporation will hire 100 security guards from the State Security Corporation

PMC Standing Committee | महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी स्थायी समिती सदस्य व  अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन! | महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना सुचवणार समिती

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे १५,६६९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य सभेत मंजूर झाले असून, या अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तसेच महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने स्थायी समिती सदस्य व प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation – PMC)

या समितीत स्थायी समितीतील निवडक सदस्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विशाल धनावडे, संदीप बेलदरे, रुपाली धाडवे, मयुरी कोकाटे, प्रशांत जगताप आणि सुहास टिंगरे यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच प्रशासनाकडून महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच संबंधित विभागांचे खातेप्रमुख यांचाही समितीत समावेश राहणार आहे.

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करसंकलन सुधारणा, थकबाकी वसुली, नवीन महसूल स्रोतांचा शोध आणि विविध आर्थिक उपाययोजनांचा आढावा घेणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असणार आहे. समितीच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीला बळकटी देत अंदाजपत्रकातील उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: