PMC Ward 2 | विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचे धडे – प्रभाग क्रमांक दोन मधील सरस्वती प्राथमिक विद्यालयात कलादालन आणि डिजिटल लॅबचे उद्घाटन

Homeadministrative

PMC Ward 2 | विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचे धडे – प्रभाग क्रमांक दोन मधील सरस्वती प्राथमिक विद्यालयात कलादालन आणि डिजिटल लॅबचे उद्घाटन

Ganesh Kumar Mule Apr 11, 2026 9:32 AM

PMC Ward No 2 | प्रभाग दोन मधील समस्यांच्या निराकरणासाठी निधी उपलब्ध करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी
MHADA | म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!
Chaitanya Laughter Yoga Mandal | सुखी जीवनासाठी हास्याची जोड हवी | डॉ. सिद्धार्थ धेंडे | चैतन्य हास्य योग मंडळाचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

PMC Ward 2 | विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचे धडे – प्रभाग क्रमांक दोन मधील सरस्वती प्राथमिक विद्यालयात कलादालन आणि डिजिटल लॅबचे उद्घाटन

– नगरसेवक सुहास टिंगरे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांची उपस्थिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मधील विद्यानगर परिसरातील सरस्वती प्राथमिक विद्यालय (मनपा शाळा क्रमांक २०६ बी) येथे आज कलादालन आणि डिजिटल लॅबचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या पूर्व संधेला त्यांनी दिलेला शिक्षणाचा वसा पुढे चालू ठेवण्याकरिता प्रभाग क्रमांक दोन मध्ये नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन संगणक प्रयोगशाळा आणि कला दालन सुरु केले. नगरसेवक सुहास टिंगरे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांच्या उपस्थितीत आणि पाठपुराव्याने हे उद्घाटन पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. तर यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, समाजसेविका शामा जाधव तसेच योगशिक्षक वाणी, समुपदेशक वैष्णवी उपस्थित होते.

याशिवाय इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या अध्यक्ष उज्वला नवले, चार्टर्ड प्रेसिडेंट सुविधा नाईक, मीना जगताप, ॲड. वंदना डांबरे आणि इतर सदस्यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

 

शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका जयश्री पाटील, सुरेखा पाटील भेंडे, अनिता गाजरे, वैशाली खांदवे, अर्चना ताडकर, सीमा पवळे आणि नंदिनी जाधव यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत कलादालनाची आकर्षक सजावट केली.

विद्यार्थ्यांना स्वतःची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षणात अधिक रुची निर्माण व्हावी, हा या कलादालना मागील मुख्य उद्देश आहे. सामाजिक व आर्थिक विषमतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा न्यूनगंड दूर करून त्यांना शाळेतच आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डिजिटल लॅबची संकल्पना राबविण्यात आली आहे. टाईमकेन बरके फाउंडेशनच्या वतीने शाळेला सात संगणक उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानंतर ‘विद्यानगर कृती समिती’च्या माध्यमातून आवश्यक फर्निचर व इतर सुविधा उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी अल्पावधीत ही जबाबदारी पूर्ण करून डिजिटल लॅब उभारणीला गती दिली.

या वेळी नगरसेवक सुहास टिंगरे म्हणाले की, या प्रभागातील सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देणार आहे. महापालिकेच्या वतीने टिंगरे नगरमधील मोझे शाळेला एक कोटींचा निधी मंजूर करून घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी आधुनिक काळाची गरज ओळखून जगातील सर्व प्रगत देशाच्या बरोबरीने भारतातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे. अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी. म्हणून संगणक प्रयोगशाळा सुरू केली, असे या प्रसंगी नमूद केले.

या वेळी विद्यानगर कृती समिती, इंटर्नल व्हील्स, निर्वाण, मंथन या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुलांनी आनंद व्यक्त केला. चार विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मध्ये प्रथम आल्याने त्यांचा नंबर आल्याने सन्मान करण्यात आला.
———–

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: