PMC Group Personal Accident Insurance | पुणे महापालिका समूह अपघात विमा योजना! | कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून योजनेचा लाभ घेणे आवश्यक

Homeadministrative

PMC Group Personal Accident Insurance | पुणे महापालिका समूह अपघात विमा योजना! | कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून योजनेचा लाभ घेणे आवश्यक

Ganesh Kumar Mule Apr 06, 2026 12:47 PM

Naval Kishor Ram IAS | आता नवल किशोर राम असणार पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त!
Kunal Kamra News | कुणाल कामराच्या वक्तव्याविरोधात पुणे शहर शिवसेना आक्रमक; पुण्यात दिसल्यास चोप देणार | शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
Kumar Gandharva | पं. कुमार गंधर्व यांचे गायन मनाला प्रफुल्लीत करणारे | उल्हास पवार

PMC Group Personal Accident Insurance | पुणे महापालिका समूह अपघात विमा योजना! | कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून योजनेचा लाभ घेणे आवश्यक

| पुणे महापलिका कामगार कल्याण विभागाचे आवाहन

 

PMC Accident Insurance | (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC GroupAccident Insurance Scheme) चालवली जाते. महापालिकेचे अनेक कर्मचारी अपघातांना बळी पडून कायमचे अपंग होतात. तसेच अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे अपघातात बळी पडणाऱ्या अशा महापालिका कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका विमा संरक्षण देत आहे. महापालिकेच्या सर्व कामगारांना आता सुमारे २५ लाखांचा विमा उतरवण्यात येत आहे. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या पगारातून केवळ ४७६ रुपये  ७२ पैसे वार्षिक म्हणजे वर्षांतून एकदाच द्यावे लागतात.  कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. असे आवाहन  मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Chief Labour Officer Nitin Kenjale PMC) यांनी केले आहे. (PMC Accident Insurance)

– सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना

महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात. आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता. परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे. कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात. यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत. अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे. अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना १० लाखांचा विमा मिळत होता. तो आता २५ लाख केला आहे. जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा १०० टक्के लाभ दिला जातो. कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे. पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून वार्षिक केवळ ४७६ रुपये ७२ पैसे द्यावे लागतात. (Pune Municipal Corporation News)

कंत्राटी कामगारांसाठी वैयक्तिक अपघात विमा

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. याच धर्तीवर पुणे मनपातील कंत्राटी कामगारांसाठी वैयक्तिक अपघात विमा उतरविणेबाबत मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी विमा कंपनीस विनंती केली होती. प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी मनुष्यबळ पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्याबाबतचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक ठेकेदारांनी आपल्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविला आहे.


समूह वैयक्तिक अपघात विम्याबाबत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी नोंद घेऊन त्यांचे कार्यालयातील कोणाचाही अपघात झाल्यास (देशात/जगभरात कुठेही) त्याची माहिती सत्वर कामगार कल्याण विभागाकडे देणे आवश्यक आहे. त्याचा फायदा हा संबंधित सेवक व त्याच्या कुटुंबीयांना होणार आहे त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.

| नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, पुणे महानगरपालिका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: