PMC Employees Promotion | विशिष्ट कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन मोकादम पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ!   | अंतिम यादी प्रसिद्ध करूनही मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त 

Homeadministrative

PMC Employees Promotion | विशिष्ट कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन मोकादम पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ!  | अंतिम यादी प्रसिद्ध करूनही मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त 

Ganesh Kumar Mule Mar 30, 2026 8:59 PM

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा | मोहन जोशी यांची मागणी
Dr. Baba Adhaav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची मागणी
Pune Grand Tour | ‘पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा लोगो व जर्सी अनावरण समारंभ २९ ऑक्टोबरला

PMC Employees Promotion | विशिष्ट कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन मोकादम पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ!

| अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करूनही मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या आरोग्य आणि घनकचरा विभागातील मोकादम पदाच्या (वर्ग ४) रिक्त जागा पदोन्नती ने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासना कडून सफाई कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. सुरुवातीला यासाठी अर्ज करण्यासाठी २ जुलै २०२५ ते पुढील १५ दिवस कालावधी देण्यात आला होता. मात्र या कालावधीत पर्याप्त अर्ज प्राप्त  न झाल्याने २३ जुलै ते १ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर यावर हरकती आणि सूचना घेऊन अंतिम सेवाज्येष्ठता यादी २७ फेब्रुवारी २०२६ ला प्रसिद्ध करण्यात आली. रिक्त जागावर पदोन्नती देण्यासाठी १८ मार्च ला पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली. मात्र यात कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता आज अचानक परिपत्रक जारी करण्यात आले कि अर्ज करण्यासाठी १० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. हे विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच लवकरात लवकर पदोन्नती देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर महापालिकेचे क्षेत्रफळ पाचशे कि.मी.च्या पुढे गेले आहे. शहराच्या भौगोलिक परिस्थितीच्या तुलनेत कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. अशातच शहर स्वच्छतेसारख्या जनतेच्या दैनंदीन गरजेसाठीच्या घनकचरा विभागातील कोठी कार्यालयांमध्ये काम करणार्‍या मुकादमांची पदेही मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. तसेच आगामी काळात स्वच्छ सर्वेचे देखील काम असणार आहे. त्यासाठी ही पदे भरणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ दिल्याने कर्मचारी वर्ग नाराज झाला आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य आणि घनकचरा विभागातील मोकादम पदाच्या (वर्ग ४) २१२ जागा रिक्त आहेत. रिक्त जागा पदोन्नती ने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र 271 कर्मचाऱ्यांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून देखील पुन्हा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ का दिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कारण एकदा अर्ज कमी आले म्हणून मुदतवाढ देण्यात आली होती. त्यासाठी पर्याप्त कालावधी देखील देण्यात आला होता. त्यामुळे पदोन्नती समिती आणि सामान्य प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण १८ मार्च ला समिती ची बैठक होऊन देखील तत्काळ परिपत्रक न जारी करता आज म्हणजे ३० मार्च ला परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे.  एकीकडे वर्ग १ किंवा २ मधील कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती दिली जाते. मात्र वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती साठी पात्र असून देखील वर्षानुवर्ष वाट पहावी लागते.

मुदतवाढ न देता प्रसिद्ध केलेल्या यादीतील कर्मचाऱ्यांना आधी पदोन्नती दिली जावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. असे नाही केले तर काही कर्मचाऱ्यांनी  न्यायालयात जाण्याची देखील तयारी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: