Nandini Dhende on PMC Medical College | महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचे खाजगीकरण करू नये | राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी मांडली भूमिका
PMC Budget 2026 – 27 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आहे. मात्र या कॉलेजला स्वतंत्र हॉस्पिटल नाही. हे हॉस्पिटल पीपीपी तत्वावर सुरू करण्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मात्र अशा पद्धतीने महापालिका मेडिकल कॉलेज चे खाजगीकरण करणे योग्य नाही. अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदिनी धेंडे यांनी मांडली. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेत धेंडे यांनी भाग घेतला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका विशद केली.
धेंडे म्हणाल्या, पुणेकर चार वर्ष स्थायी समितीच्या बजेट ची वाट पाहत होते. बऱ्याच गोष्टी आणि योजना या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. त्याचे स्वागत मात्र काही गोष्टी सभागृहाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे.
धेंडे म्हणाल्या, कुठलेही मेडिकल कॉलेज सुरू केले जाते, तेव्हा त्यासाठी स्वतःचे हॉस्पिटल असणे गरजेचे. मात्र पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला स्वतःचे हॉस्पिटल नाही. ते पीपीपी तत्त्वावर सुरू करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी बजेट सादर करताना सांगितले. पीपीपी तत्वावर म्हणजे याचा कल खाजगीकरण कडे होत आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या खाजगीकरणाला माझा विरोध सक्त विरोध आहे. असे धेंडे यांनी सांगितले.
धेंडे पुढे म्हणाल्या, आपले हॉस्पिटल नसताना आपण कॉलेज सुरू केले. हे कॉलेज कमला नेहरू हॉस्पिटलला ला आपण सलग्न केले. मात्र त्या दवाखान्यात विविध गोष्टींची पूर्तता नाही. मग असे असताना मेडिकल कॉलेज चा अट्टहास का? कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये सर्व सुख सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला ससून वर अवलंबून राहावे लागते.
धेंडे यांनी पुढे सांगितले कि, किफायतशीर आणि माफक दरात आरोग्याच्या सुविधा मिळणार नसतील, तर पुणेकरांनी कुणाकडे पाहायचे? महापालिका अर्थसंकल्प मध्ये फक्त १८० कोटी उपचारासाठी तरतूद केली आहे. म्हणजे ही तरतूद कमी असून याची टक्केवारी बजेट मध्ये अवघा १ टक्का आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. सर्वसामान्य आपल्याकडे आशेने बघतोय. वाजपेयी याना बाहेर देशात योग्य उपचार दिले तसेच आपण योग्य सुविधा आपल्या रुग्णालयात सर्व सामान्य नागरिकांना देणे गरजेचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे कॉलेज चे खाजगीकरण करू नये.
धेंडे पुढे म्हणाल्या, प्राथमिक शिक्षणाचा जास्त खर्च हा पगारावर होतोय. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर १ टक्का खर्च होणार आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. त्यामुळे शिक्षणावर जास्त खर्च करणे अपेक्षित आहे, मात्र अर्थसंकल्प मध्ये तसे काही दिसत नाही.

COMMENTS
पुण्याचा संतुलित विकास करण्याच्या दृष्टीने नंदीनी धेंडेमॅडम ह्यांनी सुचविलेली मागणी अगदी योग्य आहे…