Gas Cylinder Shortage | सरकारने हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक थांबवावी | गॅस सिलींडर तातडीने द्या अन्यथा आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

HomeBreaking News

Gas Cylinder Shortage | सरकारने हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक थांबवावी | गॅस सिलींडर तातडीने द्या अन्यथा आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Mar 24, 2026 8:20 AM

Municipal Election | न्यायालयीन लढ्याला यश आले | प्रशांत जगताप 
Pune Water cut on Thursday | पुणे शहरात उद्या (गुरुवारी) या भागात पाणीपुरवठा राहणार बंद 
Pune Bopdev Ghat Incident | निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्ययावत कराव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त घालते वेळी सायरनचा वापर करा

Gas Cylinder Shortage | सरकारने हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक थांबवावी | गॅस सिलींडर तातडीने द्या अन्यथा आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – व्यावसायिक गॅस सिलींडर वरील २० टक्के निर्बंध सोमवार दि . २३ पासून उठविण्याची घोषणा मोदी सरकारने केली .प्रत्यक्षात सिलींडर मिळालेच नाहीत . ही फसवणूक थांबवावी आणि उद्या मंगळवार पासून हॉटेल व्यावसायिकांना सिलींडर पुरवावेत अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज सोमवारी दिला. (Mohan Joshi Pune Congress)

शहरातील विविध भागातील हॉटेल मालक , खानावळींचे मालक यांच्याशी चर्चा केली . गॅस सिलींडर मिळालेच नाही असे समजले . जिल्हा प्रशासनाकडेही व्यावसायिक गॅस सिलींडरवरील निर्बंध शिथील केल्याचे आदेश आले नव्हते अशीही माहिती मिळाल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे .

हॉटेल आणि खाद्य पदार्थांच्या व्यवसायावर हजारो लोक अवलंबून आहेत .सोमवारपासून निर्बंध शिथील होतील आणि व्यवसायाला थोडा हातभार लागेल अशी आशा होती . आता मात्र सरकारने एकही दिवस न दवडता हॉटेल खानावळी आदींसाठी गॅस सिलींडर द्यावेत . अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे .

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: