Pune Shivsena on Bharat Mandpam | भारत मंडपम च्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार पत्रव्यवहार | प्रमोद नाना भानगिरे

HomeBreaking News

Pune Shivsena on Bharat Mandpam | भारत मंडपम च्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार पत्रव्यवहार | प्रमोद नाना भानगिरे

Ganesh Kumar Mule Mar 23, 2026 9:20 AM

Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य  
Mahatma Phule Memorial Bhavani Peth |  महात्मा फुले स्मारक परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करा
Chhatrapati Sambhaji Maharaj Statue | महंमदवाडीत उभारला जाणार  छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा | शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेची मान्यता

Pune Shivsena on Bharat Mandpam | भारत मंडपम च्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार पत्रव्यवहार | प्रमोद नाना भानगिरे

Pune PMC News – (The Karbhari News Service) – लोहगाव सर्वे क्र. 236 व 238 येथील नागरिकांसाठी आरक्षित मंडई, रुग्णालय, उद्यान, क्रीडांगण, पार्किंग व पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांची जागा रद्द करून “भारत मंडपम” कन्व्हेन्शन सेंटरचा प्रस्ताव मांडणे हे पूर्णतः नियोजनशून्य, तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण व नागरिकविरोधी आहे. अशी टीका शिवसेनेने केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला जाणार आहे. तसेच हा प्रस्ताव मान्य केला तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे. (Pramod nana Bhangire)

भानगिरे म्हणाले, या प्रकल्पामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होऊन दैनंदिन जीवन विस्कळीत होणार आहे, तसेच विद्यमान पायाभूत सुविधांवर असह्य ताण येणार आहे. कोणत्याही विकासकांच्या मर्जीसाठी नागरिकांना वेठीस धरता येणार नाही; आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, ट्रॅफिक इम्पॅक्ट अॅनालिसिस व शहरी नियोजनाची प्रक्रिया पूर्ण न करता असे निर्णय लादणे अमान्य आहे. आज सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडला जाणार असला तरी कोणत्याही दबावाला बळी न पडता विकासकांच्या हितसंबंधासाठी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव शिवसेना मंजूर होऊ देणार नाही. पुणेकरांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या या निर्णयाला शिवसेनेचा कडाडून विरोध असून, गरज पडल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: