OPS – PMC Employees  | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ३० एप्रिल  पर्यंत अर्ज करता येणार | पर्याय सादर नाही केला तर योजना लागू नाही | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

Homeadministrative

OPS – PMC Employees  | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ३० एप्रिल  पर्यंत अर्ज करता येणार | पर्याय सादर नाही केला तर योजना लागू नाही | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule Mar 21, 2026 7:44 PM

Nana Bhangire | PMC Pune | कर संकलन (property tax) विभागातील ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात | शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांची मागणी 
PMC CFC Centers | नागरी सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे IT विभागाचे आदेश! 
Municipal Election | Ward Structure | प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची माजी नगरसेवकांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी 

OPS – PMC Employees  | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ३० एप्रिल  पर्यंत अर्ज करता येणार | पर्याय सादर नाही केला तर योजना लागू नाही | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

 

Old Pension Scheme – (The Karbhari News Service) – १ नोव्हेंबर २००६ पूर्वी पदभरती जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत ०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्या नंतर रुजू झालेल्या पुणेमहानगरपालिका अधिकारी / कर्मचारी (PMC Employees) यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन (OPS) योजना लागू करणेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० एप्रिल पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. पर्याय सादर नाही केला तर जुनी पेन्शन लागू होणार नाही. याबाबतचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर  (Pavneet Kaur IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत ०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्या नंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबतचे शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना अशा प्रकारे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा एक वेळचा पर्याय (One Time Option) मागविण्यासाठी कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आलेले होते.

आता पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना शासन निर्णयाचे अनुषंगाने जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा एक वेळचा पर्याय (One Time Option) देणेसाठी ३० एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.  आदेशात पुढे म्हटले आहे की, वरीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून प्राप्त होणाऱ्या अर्जानुसार संबंधित खातेप्रमुखांनी आदेशात नमूद केल्यानुसार १५ मे रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावी. जे अधिकारी / कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेसाठीचा पर्याय सादर करणार नाहीत, त्यांना जुनी पेन्शन लागू होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: