Naval Kishore Ram IAS | जास्तीत जास्त चेंबर्स सम पातळीवर आणण्याची कार्यवाही अधिक गतीने करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या सूचना
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त यांनी आज बैठक घेऊन दररोज जास्तीत जास्त चेंबर्स सम पातळीवर आणण्याची कार्यवाही अधिक गतीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
पुणे शहर परिसरातील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत करणे, फुटपाथ दुरुस्ती करणे इत्यादी कामाबाबत आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम, यांचेमार्फत बैठक आयोजित करण्यात आली होती. (Pune News)
पुणे शहरात मध्यंतरी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मार्गावर २ हजार सर्व प्रकारचे चेंबर्स झाकणे रस्त्याच्या समपातळीत आणून मार्ग व्यवस्थित करण्यात आला आहे. मात्र, स्पर्धेच्या मार्गापुरतेच काम मर्यादित राहिले आहे. शहरातील इतर भागातील रस्त्यावरील पावसाळी व ड्रेनेजची झाकणे समपातळीत न आल्याने त्यांच्या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होत आहेत.
पुणे महानगरपालिके मार्फत सुरु असलेल्या कार्यवाही बाबतची वस्तुस्थिती नवल किशोर राम यांनी सांगितली.:
• पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थाना दिलेल्या निर्देशांनुसार रस्ते खड्डे मुक्त अभियान पुणे महानगरपालिकेने सुरु केले.
• या बरोबरच रस्तावरील पावसाळी लाइन चे चेंबर्स रस्त्याच्या सम पातळीत आणणे याबाबतचे या अभियानाचे रितसर उद्घाटन दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले असून त्या दिवसापासून संपूर्ण शहरभर पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत या बाबतचे कामकाज सुरु आहे.
• पुण्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या वेळी चेंबर समापतळीत आणण्याबाबतची जी एस.ओ.पी. तयार करण्यात आली होती, त्यानुसारच चेंबर समापतळीत आणण्याची कार्यवाही सुरू आहे.
• संपूर्ण शहरात पथ विभागाकडील कडील झोन वाईज वेगवेगळ्या ठेकेदार यांना महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 5 2.2 अन्वये नेमणुकी करून चेंबर समापतळीत आणण्याचे कामकाज सुरू आहे. याबाबत दैनंदिन केलेल्या कामाचा आढावा घेऊन केलेल्या कामाची आकडेवारी दरोरोज महापालिका आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येत आहे.
• दिवसा असलेली वाहतूक विचारत घेऊन रात्री एस.ओ.पी नुसार चेंबर समपातळीमध्ये आणण्याचे काम करीत असताना, रस्ता कटरच्या साह्याने व ब्रेकरच्या साह्याने कट करीत असताना होणा-या आवाजाचा नागरिकांना, विद्यार्थ्यांना परीक्षा कालवधी असल्याने त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने रात्री काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. आवश्यक त्या दक्षता घेऊन ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी कामे करण्यात येत आहेत.
• सद्यस्थिती संपूर्ण शहरात पावसाळी ,लाईन वरील आज मितीस सुमारे १२८३ एवढे चेम्बर्स समपातळी घेण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. पावसाळी वाहिन्यांवरील चेम्बर्स पथविभागामार्फत तर ड्रेनेजची गोल चेम्बर्स ड्रेनेज विभागाकडून समपातळीवर करण्यात येत आहेत.
• रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वातील चेम्बर्सची पातळी खाली गेल्याने त्याठिकाणी निर्माण होणा-या खड्यांमुळे होणारे अपघात हे यामुळे टाळता येणार आहेत.

COMMENTS