Man Hinjewadi Shivajinagar Metro | माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो : मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट!

Homeadministrative

Man Hinjewadi Shivajinagar Metro | माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो : मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट!

Ganesh Kumar Mule Mar 20, 2026 7:18 PM

PMRDA Pune | अनधिकृत सहा मजली इमारत जमीनदोस्त
PMRDA | पंधरा दिवसात रस्त्याचे काम करण्याचा अल्टिमेटम | पीएमआरडीएच्या आयुक्तांनी बजावली पीआयटीसीएमआरएलला नोटीस
PMRDA Pune | PMRDA च्या दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

Man Hinjewadi Shivajinagar Metro | माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो : मे २०२६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट!

 

Dr Abhijieet Chaudhari IAS – (The Karbhari News Service) –  पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो लाईन ३’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीए प्रशासनाने निश्चित केले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (दि. १९) जात पाहणी केली, व या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. (PMRDA Pune)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पाचे काम आता ‘मिशन मोड’वर सुरू झाले आहे. पीएमआरडीएच्या औंध येथील कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर, गुरुवारी सकाळी महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माण ते शिवाजीनगर या मार्गावरील २३ स्थानकांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते. “कामाचा वेग वाढवताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका,” अशा कडक सूचना महानगर आयुक्तांनी कंत्राटदार कंपन्यांना दिल्या आहेत. त्यांनी २३.२ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली. केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता, त्यांनी प्रत्यक्ष कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची सद्यस्थिती जाणून घेतली. पहिल्या टप्प्यात १२ स्थानके कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यादृष्टीने कामाला गती देण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी दिले आहेत.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटी कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी ही मेट्रो धावणे आवश्यक आहे. मेट्रोमुळे खासगी वाहनांवरील ताण कमी होऊन शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होईल. सध्या प्रकल्पाचे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी सुरू आहे. तसेच आरडीएसओ (RDSO) आणि सीएमआरएस (CMRS) तपासणीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.


प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
१. स्वरूप: सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील देशातील पहिली मेट्रो.
२. मार्गिका: हिंजवडी ते शिवाजीनगर (२३.२ किमी, उन्नत मार्ग).
३. भागीदार: टाटा समूहाची ‘टीआरआयएल’ (TRIL) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स.
४. एकूण खर्च: ८,३१३ कोटी रुपये.

“मे २०२६ पर्यंत १२ स्थानकांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी ‘पीएमआरडीए’कडून सर्व आवश्यक सहकार्य तत्परतेने दिले जाईल.”

डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: