PMC Property Tax Cheque Bounce | वर्षभरात 32 कोटींचे चेक बाऊन्स | महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्यावर मिळकतकर विभाग करणार कारवाई 

Homeadministrative

PMC Property Tax Cheque Bounce | वर्षभरात 32 कोटींचे चेक बाऊन्स | महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्यावर मिळकतकर विभाग करणार कारवाई 

Ganesh Kumar Mule Mar 20, 2026 5:06 PM

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेला 1283 कोटींचे उत्पन्न | बुधवारी मिळाले 15.26 कोटी
PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा
PMC Employees Promotion | Arvind Shinde | प्रॉपर्टी टॅक्स खात्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच खात्यात बढती देऊ नये | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

PMC Property Tax Cheque Bounce | वर्षभरात 32 कोटींचे चेक बाऊन्स | महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्यावर मिळकतकर विभाग करणार कारवाई

| मिळकत कर विभागाने 510 लोकांना पाठवल्या नोटीसा

 

Pune Property Tax – (The Karbhari News Service) – १ एप्रिल २०२५ पासून अनेक नागरिकांनी मिळकतकराचा धनादेशाद्वारे भरणा केला आहे. तथापि,  भरणा करताना धनादेश देताना राहून गेलेल्या धनादेशातील त्रुटीमुळे तसेच नागरिकांच्या बँक खात्यात असलेल्या अपु-या शिल्लकेमुळे तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे धानादेश वटले गेले नाहीत. या वर्षभरात ३२ कोटींचे चेक बाउन्स झाले आहेत. अशा पद्धतीने महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या मिळकत धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त रवी पवार यांनी दिला आहे. (PMC Property tax Department)

कर आकारणी व कर संकलन कार्यालयामार्फत प्रतिवर्षी मिळकतकर देयकांचे वाटप करण्यात येते.  देयकांचा विहित मुदतीत भरणा करण्याची जबाबदारी मिळकतदारांची असते. त्याअनुषंगाने जवळच्या क्षेत्रिय कार्यालयात तसेच मुख्य इमारत पुणे महानगरपालिका येथील नागरी सुविधा केंद्रात धनादेशाद्वारे मिळकतकर भरणा नागरिक करतात.
१ एप्रिल २०२५ पासून अनेक नागरिकांनी मिळकतकराचा धनादेशाद्वारे भरणा केला आहे. तथापि, सदर भरणा करताना धनादेश देताना राहून गेलेल्या धनादेशातील त्रुटीमुळे तसेच नागरिकांच्या बँक खात्यात असलेल्या अपु-या शिल्लकेमुळे तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे धानादेश वटले गेले नाहीत. ८७१ मिळकत धारकांचे चेक बाउन्स झाले आहेत. त्या माध्यमातून महापालिकेला ३२ कोटी रुपये मिळाले न्हाईत.

अशा ५१० मिळकतधारकांना The Negotiable Instruments Act 1881 Chapter XVII Section 138 अन्वये  नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर मिळकतधारकांनी अद्याप पर्यंत मिळकतीचा भरणा केलेला दिसून येत नाही. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मिळकतदारांवर कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान 2025-26 या वर्षात एकूण १ लाख ३२ हजार ४०० लोकांनी चेक च्या माध्यमातून भरणा केला. त्यातून महापालिकेला ९४० कोटींचे उत्पन्न मिळाले. वर्षभरात ४२०१ चेक बाउन्स झाले. मात्र नोटीसा दिल्यानंतर त्यातील ३ हजार ३३० लोकांनी कर भरणा केला. ही रक्कम ५६ कोटी इतकी आहे. तर ८७१ लोकांचे चेक बाउन्स झाले असताना त्यांनी अजून भरणा केला नाही. ही  रक्कम ३२ कोटी इतकी आहे.

——

तरी ज्या नागरिकांचे मिळकत कराचे धनादेश वटले नाहीत त्यांनी त्यांच्या मिळकतकराची रक्कम त्वरित पुणे महानगरपालिकेकडे जमा करावी. विहित मुदतीत सदरचा धनादेशाचा भरणा न केल्यास नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे याची  नोंद घ्यावी.

| रवी पवार, उपायुक्त, मिळकतकर विभाग.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: