Pune Mahapour Shree 2026 | राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 चा मानकरी ठरला अजिंक्य रेडेकर!

HomeBreaking News

Pune Mahapour Shree 2026 | राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 चा मानकरी ठरला अजिंक्य रेडेकर!

Ganesh Kumar Mule Mar 17, 2026 8:17 PM

Maval Shree Bodybuilding Competetion | पाचव्या वर्षातील मावळ श्री चा शिलेदार ठरला विनोद कागडे!
Bodybuilding Competetion | जिल्हास्तरीय सिंहगड श्री 2026 स्पर्धाचे निकाल जाहीर! 
Bodybuilding Competetion |  पुणे जिल्हास्तरीय पुणे श्री 2025 या स्पर्धेमध्ये प्रथमच खेळाडूंसाठी पाच गदांचा सन्मान

Pune Mahapour Shree 2026 | राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 चा मानकरी ठरला अजिंक्य रेडेकर!

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महापौर चषक या विविध स्पर्धांचे आयोजन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 ही शरीर सौष्ठव स्पर्धा श्री गणेश गार्डन, नांदेड फाटा सिंहगड रोड पुणे या ठिकाणी पार पाडण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन खडकवासला मतदारसंघातील धनश्री दत्तात्रय कोल्हे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. (Pune Breaking News)

बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन पुणे या महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या संघटनेच्या मार्फत स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धा 14 मार्च 2026 रोजी सुरू करण्यात आल्या या प्रथम दिवशीच्या पुणे जिल्ह्यातील निवड चाचणीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी 135 खेळाडूंमधून 70 खेळाडूंची निवड करण्यात आली या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य या स्पर्धेमधील विजेता व रँकिंग केल्यानंतर त्यांना स्थानिक नगरसेविका  धनश्रीताई दत्तात्रय कोल्हे यांनी रोख रकमेने त्यांचे कौतुक केले त्याच प्रमाणे अंतिम विजेता शुभम भोईटे या खेळाडूस खडकवासला श्री 2026 घोषित करून त्यालाही रोख रक्कम देण्यात आली. या प्रथम दिवशी महिला शरीर सौष्ठव पटू व महिला फिटनेस स्पर्धक यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला.

या स्पर्धेतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसे देण्यात आली खेळाडूंना सप्लीमेंट व ट्रॅक सूट गिफ्ट देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून खेळाडूंचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला.

दिनांक 15 मार्च 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता अंतिम स्पर्धेच्या समारंभ प्रसंगी महापौर मंजुषा  नागपूरे यांनी स्पर्धकांना ” तरुणांनी नवीन युगाकडे वाटचाल करत असताना दैनंदिन व्यायाम करणे गरजेचे असल्याचे व व्यसनापासून भावी पिढी मुक्त झाली पाहिजे, त्यांना खेळाची आवड झाली पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी व्यसनमुक्ती कडून व्यायामाकडे वाटचाल करावी, असे आव्हान केले.

अजिंक्य रेडेकर, नंदलाल झा व पंचक्षरी लोणार यांच्यातील अतितटीच्या झालेल्या सामन्यात राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 चा विजेता कोल्हापूर जिल्ह्याचा अजिंक्य रेडेकर ठरला व उपविजेता मुंबईचा नंदलाल झा ठरला.

या स्पर्धेतील बेस्ट पोजरचा मानकरी मुंबईचा अभिषेक खेडेकर व मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा मानकरी सोलापूर जिल्ह्याचा पंचाक्षरी लोणार ठरला.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. मंजुषाताई दीपक नागपुरे महापौर पुणे महानगरपालिका, मा दीपक नागपुरे, मा.धनश्रीताई दत्तात्रय कोल्हे नगरसेविका, मा. अनिकेत हरपुडे सदस्य युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य, मा दत्तात्रय महादेव कोल्हे महाराष्ट्र प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा, मा विजय मते, मा रमेश गायकवाड, मा विजय कोल्हे, मा महेश हगवणे, मा यशवंत कोल्हे, मा राजेंद्र चव्हाण सेक्रेटरी, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, मा शरद मारणे उपाध्यक्ष, मा अजय गोळे खजिनदार व महाराष्ट्र राज्यातील बॉडी बिल्डिंग संघटनेचे सर्व जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये प्रमुख पंच म्हणून गोपाळ गायकवाड, शरद मारणे, राजेंद्र चव्हाण, मंदार चवरकर, राजेंद्र हेंद्रे, राजेश वडाम, हेमंत खेबडे, मुरली वत्स, मयूर दरंदले, राजन परब, मंदार आगवणकर, प्रभाकर कदम, अनिल गोरे यांनी काम पाहिले.

पुणे महापौर चषक स्पर्धेतील राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

50 ते 55 किलोवॅट

1. प्रमोद सूर्यवंशी सांगली
2. प्रणय मुरकर रायगड
3. अजय कुंभारे ठाणे
4. निलेश गजमल पुणे
5. आकाश देसाई सातारा
6. सोमनाथ पाल पुणे
7. गौरव भरणे पुणे

55 ते 60 किलो गट

1. नितीन म्हात्रे ठाणे
2. मच्छिंद्रनाथ तुंगारे ठाणे
3. रामचंद्र मैनाक सातारा
4. अर्जुन देडे पुणे
5. प्रसाद पोकळा ठाणे
6. विश्वजीत देशमुख मुंबई
7. विकास राठोड पुणे

60 ते 65 किलो गट

1. राकेश मोरे पालघर
2. सुरेश मातडे रत्नागिरी
3. गोरखनाथ मांडकोळी ठाणे
4. संदीप तिवडे पुणे
5. उदय कदम सातारा
6. अमोल गावडे पुणे
7. दिग्विजय पालेकर कोल्हापूर

65 ते 70 किलो गट

1. कुणाल सातवे ठाणे
2. बबनराव नकुलदास मुंबई
3. संजय पवार ठाणे
4. मयूर कानसकर पुणे
5. निखिल अंभोरे नवी मुंबई
6. युनुस शेख सोलापूर
7. रोहन पुजारी मुंबई

70 ते 75 किलो गट

1. पंचाक्षरी लोणार सोलापूर
2. शुभम भोईटे पुणे
3. अरबाज शेख पुणे
4. जितेंद्र गिरी जळगाव
5. उदय धुमाळ मुंबई
6. मनोज माळी मुंबई
7. मयूर जवळे जळगाव

75 ते 80 किलो गट

1. नंदलाल झा मुंबई
2. हर्षद मेवेकरी सांगली
3. प्रतीक बजागे ठाणे
4. दिनेश राठोड रायगड
5. मिलिंद खर्चणे पुणे
6. जिग्नेश गवंडे ठाणे
7. सुनील पाटील ठाणे

80 ते 85 किलो गट

1. अजिंक्य रेडकर कोल्हापूर
2. अक्षय शिंदे पुणे
3. गोपाळ फौजदार पालघर
4. सचिन थापा पालघर
5. अमित जाधव पालघर
6. गोपाळ सोळंकी पुणे
7. अभिषेक खेडकर मुंबई

85 किलो वरील खुला गट

1. राहुल झेंडे ठाणे
2. अशुतोष सहा पोलीस ऑ.
3. फिरोज शेख पुणे
4. साजिद कुरेशी जळगाव
5. राशीद शेख ठाणे
6. ऋग्वेद कुलकर्णी सांगली
7. शुभम पाखरे कोल्हापूर

मेन्स फिजिक्स उंची 170 सेंटीमीटर आतील गट

1. अजित तावरे पुणे
2. फैजान खान छ. संभाजीनगर
3. राहुल जाधव सातारा
4. ऋतिक येरुणकर रायगड
5. दीपक गायकवाड ठाणे
6. भाऊसाहेब गुंजाळ पुणे
7. प्रफुल्ल गायकवाड पुणे

मेन्स फिजिक उंची 170 सेंटीमीटर वरील गट

1. श्रेयश म्हात्रे रायगड
2. गौरव यादव सातारा
3. रितिक गाडेकर नाशिक
4. रोहन गोगावले पुणे
5. आदित्य ठोंबरे सातारा
6. सियाल शेख सातारा
7. अजय बोर्डे अहिल्यानगर

बेस्ट पोजर अभिषेक खेडेकर मुंबई
मोस्ट इम्प्रुड पंचाक्षरी लोणार सोलापूर
उपविजेता नंदलाल झा मुंबई
राज्यस्तरीय पुणे महापौर श्री 2026 चा विजेता ठरला अजिंक्य रेडेकर कोल्हापूर

या स्पर्धेचे सूत्रसंचालन अजय गोळे, सर्वेश पराडकर व किरण जाधव यांनी केले.
पाहुण्यांचे स्वागत मा नगरसेविका सौ धनश्रीताई दत्तात्रय कोल्हे, दत्तात्रय महादेव कोल्हे व अजय लक्ष्मण गोळे यांनी केले.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: