PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक

Homeadministrative

PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक

Ganesh Kumar Mule Mar 12, 2026 8:12 PM

Kitit Somaiya: PMC: ‘त्याच’ पायऱ्यांवरून किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
Chandrakant Patil Vs Shivsena : भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार! : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा : किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
Murlidhar Mohol : Kirit Somaiya : किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण : महापौरांनी आयुक्तांना मागितला खुलासा 

PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक

 

Pune PMC News -(The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना जन्म व मृत्यु प्रमाणपत्रे जन्म किंवा मृत्यु घटनेनुसार तसेच मागणीनुसार दिली जातात. या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी आज  दुपारी १.०० वाजता महापौर कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

बैठकीस महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली किरीट सोमय्या (माजी खासदार), गणेश बिडकर (सभागृहनेते),  धीरज घाटे (शहराध्यक्ष),  नवल किशोर राम (महापालिका आयुक्त),  पवनीत कौर (अतिरिक्त आयुक्त),  शैलेश शंके (एसीपी क्राईम),  डॉ. नीना बोराडे (आरोग्यप्रमुख),  राहुल जगताप (संगणक व तंत्रज्ञान विभाग प्रमुख) तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील निबंधक उपस्थित होते.

बैठकीत जन्म व मृत्यु प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि काटेकोर पडताळणी आवश्यक असल्यावर भर देण्यात आला. सन २०१९ पासून केंद्र सरकारने सी.आर.एस. (Civil Registration System) प्रणालीअंतर्गत क्यूआर कोडसह प्रमाणपत्रे देण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार सर्व नोंदी प्रणालीवर अपलोड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

मालेगाव, अमरावती, भिवंडी, मुंबई आदी ठिकाणी बोगस जन्म व मृत्यु प्रमाणपत्रांच्या घटना समोर आल्यामुळे या विषयाकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मागील पाच वर्षांत मागणीनुसार देण्यात आलेले जन्म व मृत्यु दाखले तसेच नाव बदल करून दिलेली प्रमाणपत्रे यांची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचना व एस.ओ.पी. नुसारच पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

महानगरपालिका प्रशासन व पोलीस विभाग यांनी समन्वयाने काम करून आवश्यक तपासणी आणि कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

उशिराने मागणी करण्यात आलेल्या जन्म व मृत्यु दाखल्यांची संख्या  –

२०२१ : २७८
२०२२ : २६३
२०२३ : १८०
२०२४ : २४२
२०२५ : ३३१
२०२६ : ११९

या संदर्भातील सर्व प्रकरणांची आवश्यक ती तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: