Prmaod Nana Bhangire on Water Issue | शिवसेना शहर प्रमुखांचा हंडा मोर्चा काढण्याचा महापालिका आयुक्तांना इशारा!

HomeBreaking News

Prmaod Nana Bhangire on Water Issue | शिवसेना शहर प्रमुखांचा हंडा मोर्चा काढण्याचा महापालिका आयुक्तांना इशारा!

Ganesh Kumar Mule Mar 06, 2026 6:52 PM

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद | पाणीपुरवठा विभागाची माहिती 
Archana Patil BJP | बिल्डर भरत नसलेल्या मिळकत कराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर का? | भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
Pune Rains | संततधार पावसामुळे पुण्यात २४ तासांत ८३ झाडे कोसळली | गेल्या ६ दिवसांत १६३ घटना

Prmaod Nana Bhangire on Water Issue | शिवसेना शहर प्रमुखांचा हंडा मोर्चा काढण्याचा महापालिका आयुक्तांना इशारा!

| मंगळवार पर्यंत दिला अल्टीमेटम

 

 

PMC Ward 41 – (The Karbhari News Service)  –  प्रभाग क्र. 41 महादेववाडी – उंड्री परिसरातील तीव्र पाणीटंचाई, पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी व दूषित पाणीपुरवठा अशा सर्व समस्यांवर तात्काळ लक्ष घालून येत्या मंगळवारपर्यंत  संबंधित विभागामार्फत प्रत्यक्ष कार्यवाही करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा, नागरिकांच्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार  रोजी शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर “हंडा मोर्चा” काढण्यात येईल. असा इशारा शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनीं महापालिका आयुक्त यांना दिला आहे. (Pune Breaking News)

प्रभाग क्र. 41 अंतर्गत महादेववाडी – उंड्री परिसरात मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या संदर्भात गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. या बाबत फेब्रुवारी महिन्यात  पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी  नंदकुमार जगताप यांना निवेदन देऊन काही  बाबी तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. यामध्ये  1) महादेववाडी, उंड्री परिसरातील सर्वे नं. 25, दोराबजी मॉल समोरील पाण्याच्या टाक्यांद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरु करणे.  सदर पाण्याच्या टाक्यांची तांत्रिक तपासणी करुन येथील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरु करण्याबाबत अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. 3) महादेववाडी – उंड्री परिसरात वाढलेली पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकरची संख्या वाढवणे. सध्या येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. 4) हेवन पार्क व राजीव गांधी परिसरातील पाणीपुरवठा लाईन/बूस्टरचे काम तातडीने पूर्ण करणे. 5) महादेववाडी परिसरातील काही भागात पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

या सर्व बाबींच्या संदर्भात यापूर्वी महानगरपालिकेकडे निवेदन देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 41 मधील नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: