Naval Kishore Ram IAS | निविदेच्या शिल्लक रकमेतून (Below Rate Tender) लावल्या जातात नवीन निविदा! | महापालिका आयुक्तांनी फटकारले | १५ मार्च नंतर बिले सादर न करण्याचे आदेश 

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | निविदेच्या शिल्लक रकमेतून (Below Rate Tender) लावल्या जातात नवीन निविदा! | महापालिका आयुक्तांनी फटकारले | १५ मार्च नंतर बिले सादर न करण्याचे आदेश 

Ganesh Kumar Mule Feb 27, 2026 12:31 PM

PMC Tender Committee | विकास कामे व वस्तु खरेदीच्या निविदा कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्तांनी  निविदा समिती केली गठीत! 
Katraj Kondhwa Road | कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती : उच्चस्तरीय समितीच्या बैठकी मध्ये अंतिम निवाडा प्रस्तावास मान्यता, पहिला टप्प्याचा ५० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा मार्ग मोकळा
Pune PMC Election 2025 | ४१ प्रभाग तर १६५ नगरसेवक! | पुणे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर 

Naval Kishore Ram IAS | निविदेच्या शिल्लक रकमेतून (Below Rate Tender) लावल्या जातात नवीन निविदा! | महापालिका आयुक्तांनी फटकारले

| १५ मार्च नंतर बिले सादर न करण्याचे आदेश

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडील विविध विकास कामे, देखभाल दुरुस्ती कामे, खरेदी, कंत्राटी कामगार, विविध सल्लागार इ. संदर्भात बाह्यस्त्रोताद्वारे / कंत्राटी पद्धतीने कामे करून घेतली जातात. या कामांच्या बिलाबाबत महापालिका आयुक्तांनी ठरवून दिली आहे. दरम्यान आयुक्तांच्या लक्षात आले आहे कि, काही विभाग पहिल्या निविदेच्या शिल्लक म्हणजे बिलो रकमेतून नवीन निविदा जारी करत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला फटकारले असून हे आर्थिक शिस्तीचे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

तसेच खरेदी आणि विविध विकास कामांची बिले सादर करण्याबाबत नियमावली ठरवून दिली आहे.

१.  शासन निर्णयाच्या अनुषंगाने सर्व विभागांनी खरेदी संबंधीच्या तसेच फर्निचरची दुरुस्ती, झेरॉक्स मशीन, संगणक, उपकरणे अथवा त्यांचे सुटे भाग यांची दुरुस्ती, नैमित्तिक कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे इ. बाबींशी संबंधित प्रस्ताव १५ फेब्रुवारी २०२६ नंतर मान्यतेकरिता सादर करू नयेत. औषधे खरेदीची बाब यास अपवाद राहील.

२. आर्थिक वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात तरतूद खर्ची पडत असल्याने याबाबत  निर्देशित करण्यात आले आहे. तरी  २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या कामांची देयके  १५ मार्च  पर्यंत मुख्य लेखा व वित्त विभागाकडे सादर करावीत. या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत देयके स्वीकारण्यात येणार नाहीत.

३. पुणे मनपातील काही विभाग निविदा मागविण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून (बिलो रक्कमेतून) नव्याने निविदा लावणे, देयके आदा करणे या प्रकारची कामे करत असल्याचे २०२६-२७ या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्प तयार करतेवेळी निदर्शनास आले आहे सदर बाब आर्थिक शिस्तीचा भंग करणारी असून सर्व खातेप्रमुखांनी अशा प्रकारचे प्रस्ताव / देयके सादर करू नयेत अथवा मान्यतेकरिता पाठवू नयेत.

४. १ मार्च २०२६ नंतर सर्व विभागांनी व क्षेत्रीय कार्यालयांनी कोणत्याही कामांच्या निविदा मागवू नयेत व कार्यादेश देण्यात येवू नयेत.

५. पथ विभागाने (मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालय) कोणतेही नवीन काम सुरु करणेपूर्वी पाणीपुरवठा विभाग / मलनिःसारण विभाग / पावसाळी वाहिन्या (storm water) या तिन्ही विभागांची ना-हरकत पत्र (NOC) असल्याशिवाय काम सुरु करू नये. जेणेकरून नवीन रस्त्यासाठी खर्च होण्यापूर्वीच रस्त्याखालील मलनिःसारण, पाणीपुरवठा वाहिन्या व पावसाळी वाहिन्याची कामे झाल्याबाबत खातरजमा होईल.

६. क्षेत्रीय कार्यालयाने पथ, पादचारी मार्ग, मलनिःसारण विभाग या संबंधित कामे सुरु करणेपूर्वी संबंधित मुख्य खात्याकडून ना-हरकत पत्र (NOC) घेणे अनिवार्य आहे. मुख्य खात्याने ना-हरकत पत्र (NOC) देणेपूर्वी सदर काम यापूर्वी करण्यात आले आहे का ? यापूर्वीच्या कामाचा दोष दायित्व कालावधी (Defect Liability Period) संपुष्टात आला आहे अगर कसे ? तसेच सदर काम Specification / Norms प्रमाणे प्रस्तावित केले आहे अगर कसे ? याबाबत खातरजमा करून तदनंतर ना-हरकत पत्र (NOC) देण्यात यावी.

असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0