PMC Ward Committee | प्रभाग रचनेनुसार प्रभाग समित्या, परिमंडळे व त्यांना संलग्न क्षेत्रिय कार्यालय स्थापन | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी 

Homeadministrative

PMC Ward Committee | प्रभाग रचनेनुसार प्रभाग समित्या, परिमंडळे व त्यांना संलग्न क्षेत्रिय कार्यालय स्थापन | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी 

Ganesh Kumar Mule Feb 26, 2026 7:44 PM

PMC Property Tax Abhay Yojana | अभय योजनेतून महापालिकेच्या मिळकतकर विभागाला ९५४ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २८६०  कोटी
PMC Pune Municipal Secretary | Even after 3 years, the Pune Municipal Corporation did not get a full-time municipal secretary!
Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले

PMC Ward Committee | प्रभाग रचनेनुसार प्रभाग समित्या, परिमंडळे व त्यांना संलग्न क्षेत्रिय कार्यालय स्थापन | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – २०२५-२६ च्या निवडणूक प्रभाग रचनेनुसार प्रभाग समित्या आणि परिमंडळे व त्यांना संलग्न क्षेत्रिय कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश जारी केले आहेत. (Naval Kishore Ram IAS)

पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये पार पडली असून सदरची निवडणुक ही ४ सभासद प्रभाग पद्धतीने झालेली आहे. त्याअनुषंगाने प्रभाग पध्दतीमध्ये फेर रचना करून नव्याने ४ सभासद प्रभाग पध्दतीने ४१ प्रभागांची निर्मिती करून २०२५-२६ ची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९ (अ) अन्वये प्रभाग समिती स्थापना करणेबाबतचे नियम नमुद आहेत. अधिनियमातील कलम २९ (अ) नुसार महानगरपालिकेस प्रभाग समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ४१ प्रभागांचा व लोकसंख्येचा विचार करुन ५ परिमंडळे व १५ प्रभाग समिती आणि त्यांना संलग्न १५ क्षेत्रिय कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे.

 

परिमंडळ क्रमांक १ |  प्रभाग समिती / क्षेत्रीय कार्यालय  – १. नगररोड कळस लोहगाव – प्रभाग क्रमांक – १, २, ३

२.  येरवडा विमाननगर वाघोली | प्रभाग क्रमांक – ४, ५, ६

३. ढोले पाटील रोड  | प्रभाग क्रमांक – १३, १४

 

परिमंडळ २  | प्रभाग समिती / क्षेत्रीय कार्यालय – १. छत्रपती शिवाजी नगर घोले रोड| प्रभाग क्रमांक – ७, १२, २९

२. औंध बाणेर | प्रभाग क्रमांक – ८, ९

३. कोथरूड बावधन | प्रभाग क्रमांक – १०, ११, ३१

 

परिमंडळ ३ | प्रभाग समिती / क्षेत्रीय कार्यालय – १. वारजे कर्वेनगर | प्रभाग क्रमांक – ३०, ३२

२. सिंहगड रोड | प्रभाग क्रमांक – २८, ३३, ३४, ३५

३. धनकवडी आंबेगाव  | प्रभाग क्रमांक – ३६, ३७, ३८

 

परिमंडळ ४ | प्रभाग समिती / क्षेत्रीय कार्यालय – १. कोंढवा उंड्री | प्रभाग क्रमांक – ३९, ४०, ४१

२. हडपसर मांजरी | प्रभाग क्रमांक – १५, १६, १७

३. वानवडी रामटेकडी |  प्रभाग क्रमांक – १८, १९.

 

परिमंडळ ५ | प्रभाग समिती / क्षेत्रीय कार्यालय – १. बिबवेवाडी | प्रभाग क्रमांक – २०, २१, २२

२. कसबा पेठ | प्रभाग क्रमांक – २३, २४

३. विश्रामबागवाडा  | प्रभाग क्रमांक – २५, २६, २७

दरम्यान  प्रभाग समिती, परिमंडळ कार्यालय व सर्व क्षेत्रिय कार्यालय यांचेकडील आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे बाबतचा आदेश प्रशासनाकडून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: