गणेश बिडकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या लाईट हाउसचे उद्घाटन ६ डिसेंबर ला
पुणे : पुणे महानगरपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांचा लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन येत्या सोमवारी (६ डिसेंबरला) होणार आहे. महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
सोमवार पेठेतील पालिकेच्या भोलागिरी प्राथमिक शाळेत दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून पालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शहरातील अल्प उत्पन्न गटातील तरुण-तरुणी तसेच सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे.
या लाईट हाऊसच्या माध्यमातून सॉफ्टवेअर टेस्टिंग, हार्डवेअर, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, टॅली, ॲनिमेशन, फोटोग्राफी, मोबाईल रिपेअरिंग, फॅशन डिझायनिंग असे अनेक कोर्स शिकविले जाणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
COMMENTS